How To Wear Nauvari Saree Marathi Video: गणपती बाप्पाचं आगमन आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. बाप्पांच्या पाठोपाठ २२ सप्टेंबरला गौराई सुद्धा माहेरपणाला येतील. आपल्यापैकी अनेकांची गणपतीसाठीची व स्वतःसाठीची खरेदी आतापर्यंत झालीच असेल, हो ना? साड्या, मॅचिंग ब्लाउज, छान- छान दाग- दागिने घालून नटण्यासाठी हा हक्काचाच सण आहे. यंदाच्या गणपतीत जर तुम्ही सगळ्या बहिणी किंवा नणंद- भावजया, सासू-सुना नऊवारी नेसण्याच्या विचारात असाल तर आजचा व्हिडीओ तुमच्यासाठी खास आहे. तसंतर अलीकडे सगळ्या मैत्रिणी रेडी टू वेअर नऊवारी शिवून घेतात, पण गणपतीच्या घाईत वेळेत साडी शिवून मिळेलच असा काही भरवसा देता येत नाही. शिवाय अगोदरच महागडी साडी घ्या आणि मग परत शिवायला हजार रुपये टाका, इतका खर्च करण्यापेक्षा ही झटपट २ मिनिटात नेसून होणारी नऊवारी काय वाईट आहे? चला बघूया..
इंस्टाग्रामवर @karishma_dheerej अशा मैत्रिणीने ही नऊवार साडीची ट्रिक शेअर केली आहे. अगदी धोती पॅन्ट सारखी नेसायला व वावरायला सहज अशी ड्रेपिंग पद्धत यात वापरली आहे. विशेष म्हणजे काहीवेळा बाजारात शिवून मिळणारी साडी ही पॅन्ट घातल्यासारखीच दिसते तसा काही प्रश्न या साडीच्या बाबत येणार नाही. पुढून छान एक कोचा (पेशवाई साडीसारखा खोचलेला भाग) येईल अशी ही ड्रेपिंग पद्धत आहे.
आता सगळ्यात मुख्य टीप म्हणजे साडी नऊवारीच काय अगदी दहा वारी जरी घेतली तरी काहीवेळा नेसताना जरा वर खाली झालं की साडी तोकडी पडू लागते आणि पण पायाच्या मागून वर जाऊन पोटऱ्यांपर्यंत येते. यामुळे साडीचा लुक खराब होतो शिवाय चालताना सुद्धा अडचण येते. अशावेळी तुम्ही तीन गोष्टी करू शकता
१) तुम्ही चक्क साडी जेव्हा पायाखालून फिरवून घ्याल तेव्हा तिला घोट्याजवळ पिन लावून सिक्युअर करू शकता.
२) पिन सुद्धा निघेल असे वाटत असेल तर डबल साईडेड टेप सुद्धा उत्तम पर्याय आहे.
३) जर तुम्ही गणपतीच्या आधी एकदा प्रत्यक्ष साडी नेसून पाहण्याचा प्रयत्न करत असाल तर तेव्हा तुम्ही धावती शिलाई मारून घेऊ शकता.
२ मिनिटात नऊवारी साडी कशी नेसावी? (How To Drape Nauvari Saree In Two Minutes)
हे ही वाचा<< VIDEO: गणपतीला वापरलेल्या फुलांपासून ५ मिनिटांत बनवा घरीच धुप; घर राहील फ्रेश, कायम सुगंधित
तुम्हाला या सोप्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि हो तुम्हा वाचकांना गणेशोत्सवाच्या आजपासूनच खूप खूप शुभेच्छा!