Monsoon Jugaad: पावसाळ्यात घरभर अचानकच ओल पसरते. अगदी तुम्ही कितीही काळजी घेतली तरी भिंती, छप्पर व जमिनीवर सुद्धा सतत ओलावा जाणवू लागतो. घरभर दमट वातावरण असल्याने मग हळूहळू कुबट वास येऊ लागणे, भिंतींना, कपड्यांना बुरशी लागायला सुरुवात होणे, लादी घसरट होणे आणि मुख्य म्हणजे आरसे, नळ यांच्यावर पाण्याचे डाग पडणे असे अनेक त्रास वाढू लागतात. आज आपण यातील एका समस्येवर रामबाण उपाय पाहणार आहोत. पावसाळ्यातच नव्हे तर एरवी सुद्धा नळावर हात धुताना, भांडी घासताना पाण्याचे शिंतोडे उडून डाग पडू शकतात. वेळीच स्वच्छता केली नाही तर हे डाग आणखी चिवट होतात नळाला गंजही लागू शकतो. एकूणच तुम्ही हौसेने सजवलेल्या घराचा लुक बिघडू शकतो. आता यासाठी तुम्हाला अवघे २ रुपये खर्च करायचे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एरवी पावसाळ्यात कधी घरातील वीज गेली की आपण जिचा आधार घेतो मेणबत्तीचीच आपण आता मदत घ्यायची आहे. तुम्हाला करायचं काय आहे. तर मेणबत्ती घेऊन ती तुम्हाला नळावर घासायची आहे. संपूर्ण नळाला मेणबत्ती म्हणजेच मेण लावायचं. मेणावर पाणी टिकत नाही परिणामी नळाला मेणबत्ती लावल्याने नळावर पाणी पडूनही थेंब साचून राहत नाही त्यामुळे डाग पडण्याचं व नळ पाण्यामुळे खराब होण्याचं टेन्शन नाही.

@simplymarathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

दरम्यान,याऐवजी तुम्ही पेट्रोलियम जेली जसे की व्हॅसलिन सुद्धा नळावर लावू शकता. शक्यतो पांढऱ्याच मेणबत्तीचा वापर करा कारण रंगीत मेणबत्तीने नळावर डाग राहू शकतात. मेणाचे डाग राहू नयेत यासाठी आपण कागद किंवा मऊ कापड वापरून नळ पुसून घेऊ शकता. हा जुगाड तुम्ही करून पहा व त्याचा रिझल्ट कसा मिळतोय हे आमच्या सोशल मीडियावरील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video use two rupees candle to clean taps mirrors in kitchen and bathroom save money with easy kitchen jugaad svs