Makhana Making Process: उपवास किंवा डाएटसाठी आवर्जून आहारात समाविष्ट केला जाणारा पदार्थ म्हणजे मखाना. अलीकडे या मखानाच्या रेसिपीचा ट्रेंड खूप व्हायरल होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की हा मखाना बनतो कसा? चला तर मग ही प्रक्रिया काय आहे व मखान्याचे फायदे काय जाणून घेऊया…

मखान्याला इंग्रजीत फॉक्स नट म्हणून ओळखले जाते. ज्याप्रकारे समुद्रातुन मोती काढले जातात तशाच प्रकारे मखाना सुद्धा कमळांच्या तळ्यातून शोधून काढले जातात, अर्थात त्यावर नंतर एक भलीमोठी प्रक्रिया केली जाते. कमळ किंवा वॉटर लिलीमधून मखाना बनवला जातो. हे मुळात कमळाच्या फुलांचे बीज आहे. बिहारमध्ये मखान्याचे उत्पादन अधिक होते तर जगभरात कोरिया, जपान, रशियामध्ये सुद्धा हे उत्पादन केले जाते.

मखान्यासाठी कमळातून बीज बाहेर काढले जाते व यांना मोठ्या पातेल्यात भिजवून नीट माती व चिखल स्वच्छ केला जातो. याला साधारण तीन ते चार वेळा नीट स्वच्छ पाण्याने धुवून घेतले जाते. या मखान्यांना नीट सुकवून मग यानंतर कढई गरम तापवून यामध्ये या बिया टाकल्या जातात व लोकहँडच्या एकदम बारीक सळईने परतून घेतल्या जातात. मग या बिया फुटून यातून पांढरे शुभ्र मखाने तयार होतात

Video: मखाना कसा तयार होतो?

मखान्याचे फायदे काय? (Benefits Of Makhana)

दरम्यान मखान्याच्या सेवनाचे अनेक फायदे आजवर अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहेत. यानुसार या पांढऱ्या शुभ्र स्नॅक्समध्ये अनेक पोषक सत्व असतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरसचा मुबलक साठा यामध्ये असतो. शिवाय अँटिऑक्सिडंट्स प्रमाण अधिक असल्याने यातून शरीराला टॉक्सिन्स बाहेर काढण्यात मदत करतात. वजन नियंत्रणात ठेवणे ते रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवणे अशा अनेक कामांसाठी या स्नॅक्सची मदत होऊ शकते. याशिवाय यामुळे तुमच्या त्वचेला अँटी एजिंग सत्व मिळू शकतात.

Story img Loader