Jaggery Tea Video: साखरेला पांढरं विष म्हंटलं जात असल्याने अलीकडे अनेकजण गोडव्यासाठी पर्याय शोधू लागले आहेत. अशात गुळाचा चहा हा प्रकार खूप प्रसिद्ध झाला आहे. अनेक चहा टपऱ्यांच्या पाट्यांवर सुद्धा गुळाचा चहा ही खासियत लिहिलेली असते. तुम्ही या टपऱ्यांवर जेव्हा गुळाचा चहा पिता तेव्हा तर त्यात काही वेगळेपण जाणवत नाही पण हाच प्रयत्न घरी करून पाहायचा झाला तर मात्र पैसे, सामान सगळ्याचीच नासाडी होते. गुळामुळे चहातील दूध फाटण्याची शक्यता असते. यामुळे जेव्हा दूध फाटल्यावर किंवा नासल्यावर जसा थर जमा होतो तसा चहावर फेसाळ थर दिसू लागतो. यामुळे चहाची चव तर बिघडतेच पण ऍसिडिटी किंवा अपचनाचा त्रास वाढण्याची सुद्धा शक्यता असते.

आज आपण याच त्रासावर उपाय पाहणार आहोत. युट्युबवरची प्रसिद्ध सुगरण म्हणजेच मधुरा रेसिपीवर अलीकडे गुळाचा चहा फाटू नये यासाठी काही सोप्या टिप्स शेअर करण्यात आल्या आहेत. या पाच टिप्स वापरून तुम्ही सुद्धा फक्कड चहा कसा बनवायचा हे शिकून घ्या.

curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
papaya sheera for breakfast
मुलांसाठी नाश्त्यात बनवा पपईचा पौष्टिक शिरा; वाचा साहित्य आणि कृती
Homemade Cough Syrups Chef Neha Deepak Shah’s homemade cough syrup is easy to make but experts are divided over its effectiveness
खोकल्यावर औषधं घेऊनही आराम नाही? डॉक्टरांनी सांगितलेलं हे संत्र्याचं सिरप बनवा घरच्या घरी

गुळाचा चहा करताना दूध फाटू नये म्हणून करा ‘हे’ सोपे उपाय

१) सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही गुळाचा खडा टाकून चालणार नाही. गूळ नीट किसून मगच चहामध्ये टाका, जेणेकरून तो विरघळायला फार वेळ लागणार नाही.

२) गूळ घातल्यावर आपल्याला चहा उकळवायचा नाही आहे. कारण त्यामुळेच दूध फाटू शकतं. याऐवजी चहा तयार झाल्यावर गॅस बंद करून मग गूळ टाका.

३) शक्य असल्यास काळा गूळ वापरावा. पिवळा रंगाचा गूळ हा प्रक्रिया केलेला असतो त्यामुळे काही अंशी सोडा त्यात असतो, यामुळे सुद्धा दूध फाटण्याची शक्यता असते.

४) जर आपल्याकडे गुळाची पावडर असेल तर चहा कपात ओतल्यावर आपल्या आवडीप्रमाणे गूळ पावडर चहात घालू शकता. तुम्ही हेच उलटही करू शकता म्हणजे गूळ घातलेला कोरा चहा बनवून घ्यायचा आणि मग कपात घेतल्यावर त्यात गरम दूध ओतायचं.

५) गुळाचा चहा कपात ओतल्यानंतर गरम गरमच प्यावा. कारण जास्तवेळ ठेवल्यास तो फाटण्याची शक्यता असते.

फक्कड चहाची सोपी रेसिपी

हे ही वाचा<< ‘मेड इन हेवन २’ मध्ये अभिनेत्रीची त्वचा गोरी होण्यासाठी वापरलेली ‘ती’ ब्युटी ट्रीटमेंट नेमकी काय? त्वचातज्ज्ञ सांगतात..

टीप: तुम्ही सुद्धा या जुगाडू आयडिया वापरून पाहा जेणेकरून तुम्हालाही स्मार्ट गृहिणींसारखी बचत करता येईल. टिप्स कशा वाटल्या कमेंट करून कळवा.

Story img Loader