महाभारत काळातील विदुरांच्या विचारांवर आधारित ‘विदुर नीति’ आहे. महात्मा विदुरांमध्ये हीच खास गोष्ट होती की, त्यांच्यामध्ये एवढी बुद्धी असूनही त्यांनी कधीही स्वतःचा किंवा आपल्या समजाचा अभिमान बाळगला नाही. विदुरजींना नेहमीच खूप बुद्धिमान मानलं जायचं, त्यामुळे त्यांचे भाऊ धृतराष्ट्र यांना त्यांच्याशी प्रत्येक विषयावर बोलणं आवडत असे.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका

विदूर नीतिमधील धोरणाच्या काही भागांमध्ये विदुर आणि धृतराष्ट्र यांच्यातील संवाद समाविष्ट केले आहेत. कौरवांच्या विरोधात जाऊनही धृतराष्ट्र अनेक बाबतीत विदुरजींचे मत घेत असत, असं म्हणतात. विदुरजींच्या सहवासामुळे महाभारतात पांडवांचा विजय झाला, असं म्हणतात. विदुरजींच्या या धोरणांबद्दल असं म्हटलं जातं की, जीवनात असे काही लोक असतात ज्यांना चुकूनही आपली कोणतीच रहस्य सांगू नये. कारण असे लोक तुम्हाला भविष्यात त्रास देऊ शकतात.

चतुर व्यक्ती : विदुर नीतिनुसार जो माणूस हुशार असतो तो सर्व रहस्ये सांगण्याच्या लायक नसतो. कारण अशा लोकांना कोणाच्याही भावनांची पर्वा नसते. असे लोक कोणाच्या तरी भावना आणि विचार ऐकतात. मग वेळ आल्यावर त्यांचा स्वतःच्या हितासाठी वापर करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच असं म्हणतात की माणसाला आयुष्यात महत्त्व द्यायचं असेल तर काही काळ थांबून विचार करणं आवश्यक आहे.

आणखी वाचा : Shukra Rashi Parivartan 2021: शुक्र राशी परिवर्तन ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरेल शुभ, उत्पन्नात वाढ होऊ शकते

लोभी व्यक्ती: विदुरजींच्या मते, लोभी व्यक्ती कोणाच्याही जवळचा होऊ शकत नाही. लोभी माणूस आपल्या वडिलांची फसवणूक देखील मानत नाही. अशा लोकांशी कोणतेही संबंध ठेवू नका आणि आपले रहस्य कधीही सांगू नका. कारण अशी व्यक्ती वेळ आल्यावर त्यांची हाव पूर्ण करण्यासाठी तुमच्या रहस्याचा वापर करू शकते.

आणखी वाचा : Vivah Muhurat 2022: 2022 मध्ये लग्नासाठी ‘हे’ आहेत सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या लग्नासाठी कोणते दिवस उत्तम आहेत ?

जास्त बोलणारे: जे लोक खूप बोलतात किंवा बोलण्याची आवड असते ते इतरांसाठी धोक्याचे ठरू शकतात. विदुर नीतिनुसार, ज्या लोकांना जास्त बोलण्याची किंवा गप्पा गोष्टी करण्याची सवय असते, ते स्वतःबद्दल कमी आणि इतरांबद्दल जास्त बोलतात. या काळात, बहुतेक लोक इतरांचे रहस्य लोकांना सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत.