जर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही विदेश दौरा करण्याचा प्लॅन करत आहात तर IRCTCने एक जबरदस्त पॅकेज घेऊन आले आहे. या टूर पॅकेजच्या मार्फत तुम्हाला व्हिएतनाम लाओस आणि कम्बोडिआ येथील प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकता. या टूरची सुरुवात लखनऊमधून होईलय IRCTC ने या टूर पॅकेजचे नाव अयोध्या से अंगकोर वाट- समर डिलाईट असे ठेवले आहे. तुम्हाला या टूर पॅकेजचे बुकिंगपासून भाड्यापर्यंत सर्व माहिती आम्ही येथे देणार आहोत.
१० दिवसांचा टूर पॅकेज
IRCTC लखनऊ कार्यालयाने अंगकोर वाट समर डिलाईट आणि व्हिएटनाम क्रुज सैरसोबत लाओस – कंबोडियासाठी टूर पॅकेज सुरु केले आहे. ही टूर १९ ते २८ मेपर्यंत १० दिवसांसाठी आयोजित करण्यात आली आहे. पर्यटक १० दिवसांच्या दक्षिण पूर्व अशियातील देश लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनामच्या ४ प्रमुख शहरांचा दौरा करू शकतात. IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, ही टूर दक्षिण पूर्व अशियातील प्राचीन भारतीय सांस्कृतिक बंध पाहण्याची संधी मिळेल.
हेही वाचा : निवांत फिरा जगन्नाथ पुरी, गंगासागर, काशी…तेही तुमच्या बजेटमध्ये! राहण्या-खाण्याची चिंता सोडा IRCTCवर
दौऱ्यापासून ते राहण्यापर्यंतची सर्व व्यवस्था केली जाणार
प्रवाशांना हनोईमध्ये क्रूज राईडसोबत क्रूजवरॉ रात्र घालविण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे आणि मंत्रमुग्ध करून टाकणारे नैसर्गिक सौंदर्य पाहण्याचीही संधी मिळणार आहे. यासोबतच प्रवाशांचा हवाई प्रवास, ४-स्टार हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था, भारतीय जेवणाची (नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवण) व्यवस्था IRCTC कडून केली जाईल.
टूर पॅकेजमध्ये हे स्थान
या टूर पॅकेजसह तुम्ही सियाम रीप (कंबोडिया)), अंगकोर वाट, कोम्पॉन्ग फुलुक फ्लोटिंग व्हिलेज, हनोई (व्हिएतनाम), एनगोक सोन मंदिर आणि होआन कीम लेक, ट्रॅन क्वोक पॅगोडा आणि वेस्ट लेक. बा डिन्हवाई, डोंग झुआन मार्केट, हँग गियांगला भेट देऊ शकता. पुर स्ट्रीट, हा लॉन्ग बे (व्हिएतनाम), हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम), युद्ध अवशेष संग्रहालय, चायनाटाउन, बिन्ह ताई मार्केट, इंडिपेंडन्स पॅलेस, मेकॉन्ग डेल्टा, व्हिएंटियाने (लाओस), सिस्केट मंदिर, कोप सेंटर, वाट प्रकेट, बुद्ध पार्क या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.
भाडे किती आहे ते जाणून घ्या
या टूर पॅकेजमध्ये दोन ते तीन प्रवासी एकत्र राहण्यासाठी पॅकेजची किंमत १,५५,४०० रुपये प्रति व्यक्ती निश्चित करण्यात आली आहे. एका व्यक्तीच्या मुक्कामासाठी पॅकेजची किंमत २,००,८०० रुपये ठेवण्यात आली आहे. या प्रवासात तुमच्यासोबत लहान मुलेही असतील, तर प्रत्येक लहान मुलांसाठी रु.१४०२००/- बेडसाठी आणि १२४७०० रुपये बेडशिवाय आकारले जातील.
हेही वाचा : कडक उन्हाळ्यात IRCTC देतेय काश्मीर फिरण्याची संधी, कमी खर्चात देऊ शकता ‘या’ 4 ठिकाणांना भेट
EMI देखील उपलब्ध आहे
याबाबत माहिती देताना IRCTC नॉर्दर्न रिजनचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अजित कुमार सिन्हा सांगितले की, या टूर पॅकेजचे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केले जाईल. या पॅकेजवर ईएमआय सुविधाही उपलब्ध आहे. या टूरच्या बुकिंगसाठी, पर्यटन भवन, गोमती नगर, लखनऊ येथे असलेल्या IRCTC कार्यालय किंवा IRCTC वेबसाइट http://www.irctctourism.com ला भेट देऊ शकते. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी तुम्ही ८२८७९३०९२२/८२८७९३०९०२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता.