वय कितीही असू दे; सर्व स्त्रियांना फुले आणि त्यांचे गजरे हे अत्यंत प्रिय असतात. एखादा सण-समारंभ, पूजा, असेल, तर महिला आपल्या केसांमध्ये हमखास गजरे माळतात. अगदी काही विशेष नसेल आणि रस्त्यावर सुंदर फुले, गजरे, वेण्या घेऊन बसलेली बाई दिसली आणि त्या फुलांचा मोहक सुगंध आला की आपोआप स्त्रियांची पावले त्या फुलांच्या दिशेने वळतात. आणि मग पटकन एखादा मोगऱ्याचा, चमेलीच्या, किंवा बकुळीच्या फुलांचा सुवासिक घमघमाट असणारा सुंदर गजरा खरेदी करून, उभ्याउभ्याच केसांमध्ये मळतात.
मात्र, तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला जाताना, जर ऐन वेळी फुले किंवा गजरा सापडलाच नाही, तर अजिबात काळजी करू नका. कारण- केवळ साध्या टिश्यू पेपरच्या मदतीने सुंदर असा गजरा तुम्ही बनवू शकता. यासंबंधीची माहिती तुम्हाला इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील itistanyasingh नावाच्या अकाउंटद्वारे टाकलेल्या व्हिडीओमधून मिळेल. तेव्हा तो जरूर पाहा.
हेही वाचा : Beauty hack : ना रेझर, ना वॅक्स, ‘असे’ घालवा चेहऱ्यावरील केस! ‘हे’ ठरतील जादुई उपाय…
टिश्यू पेपरचा सुंदर गजरा
साहित्य
टिश्यू पेपर
दोरा
सुई
हिरवा रंग
कृती
सर्वप्रथम टिश्यू पेपरचे लहान लहान गोळे करून घ्या. हे गोळे टिश्यू पेपरच्या लहान चौकोनी तुकड्यावर ठेवा.
आता त्या चौकोनी तुकड्याचे कोपरे एकमेकांना जोडून बोटाने थोडे पिळून घ्या.
असे केल्याने त्या टिश्यू पेपरला मोगऱ्याच्या कळ्यांसारखा आकार प्राप्त होईल. तुम्हाला हव्या तेवढ्या कळ्या आधी बनवून घ्या.
आता टिश्यू पेपरच्या पिळून घेतलेल्या भागाला हिरवा रंग लावून घ्या. म्हणजे तो भाग कळ्यांच्या देठासारखा दिसेल.
आता एकेक करीत, या कळ्यांना सुईच्या मदतीने दोऱ्यात ओवून घ्या. बघा तयार झाला आहे तुमचा टिश्यू पेपरपासून बनविलेला सुंदर आणि टिकाऊ असा गजरा.
हेही वाचा : Hair care : अरे बापरे! लहान वयातच केस पांढरे? पाहा ‘या’ घरगुती गोष्टी करतील तुमची मदत
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीदेखील काही प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या पाहू.
“आणि पाऊस आला तर,” असा एकाने प्रश्न केला आहे. “वाह! खूपच सुंदर बनवला आहे,” असे दुसऱ्याने म्हटले आहे. “सुंदर,” असे तिसऱ्याने लिहिले आहे.
@itistanyasingh या अकाउंटने शेअर केलेल्या या भन्नाट व्हिडीओला आतापर्यंत २६.८ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.