Kitchen Jugaad Video: स्वयंपाकासाठी, पुजेसाठी नारळाचा वापर आपण वरचेवर करतच असतो. सणावाराला नारळाचे लाडू, बर्फी, भात असे विविध गोड पदार्थही तयार केले जातात. नारळाचं पाणी आणि नारळाचा गर आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो. त्यामुळे नारळाच्या शेंड्या, नारळाचे कवटी टाकून दिली जाते. पण थांबा इथून पुढे असं करु नका. कारण एका गृहीणीने या नारळाच्या शेंडीचा एक हटके उपयोग सांगितला आहे. चपाती करताना नारळाचा वापर, वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आतापर्यंत तुम्ही चपाती बरोबर नारळाची चटणी खाल्ली असेल. पण कधी चपाती करताना नारळ वापरून पाहिला आहे का? अशाच जबरदस्त किचन जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होतो आहे.

या गृहीणीने व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार नारळाचा ही शेंडी खूप कामाची आहे. चपाती करताना तुम्हाला याचा मोठा उपयोग होईल. आता तो कसा ते पाहूयात.

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

चपातीवर नारळ फिरवल्यावर काय होतं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला सुरुवातीला नारळाची शेंडी काढून घ्या. त्याची शेंडी एक असते, म्हणजे ते दोरे एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ते सुटे करून घ्या. आता ते पुन्हा एकत्र करून एका दोरीने घट्ट बांधून घ्या. आता हा तुमचा घरगुती ब्रश तयार झाला. याचा वापर तुम्ही डोसा बनवताना तव्यावर आणि चपाती करताना चपातीवर तेल लावण्यासाठी करू शकता. शिवाय तुम्ही याने चपाती तव्यावर फिरवू शकता, दाब देऊन चपाती फुलवूही शकता. अनेकदा चपाती शेकवताना हात भाजतो, अशावेळी याचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तेही शून्य रुपयात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: साबणामध्ये लावा सेफ्टी पिन्स; महिलांना होणार मोठा फायदा, पण पुरुषांनी चुकूनही…

@Simply marathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये याचा फायदा कसा वाटला ते आपली कमेंट करून नक्की सांगा.

Story img Loader