How To Save Electricity Bill Through Fridge: पावसाळा सुरू झाला आहे. परंतु, अनेकांचे लाइट बिल कमी झाले नाही. अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसाप्रमाणेच वीज बिल येत आहे. तुम्हाला जर वीज बचत करायची असेल तर तुम्ही काही गोष्टीत बदल करू शकतात. तुम्हाला दर महिन्यातील विजेचे बिल कमी येईल.एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे. जर तुम्हाला दर महिन्याला विजेचे बिल भरमसाठ येत असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या काही ट्रिक्सचा वापर करून वीज बिल कमी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.
फ्रिज म्हटलं की लाइट बिल आलंच. वारंवार फ्रीज उघडल्याने फ्रीजच्या आतील तापमानावर फरक पडतो आणि फ्रीजला आतील तापमान थंड ठेवण्यासाठी वीजही जास्त लागते. परिणामी लाईट बिल जास्त येतं. पण आता फ्रीजमुळे लाईट बिल वाढण्याचं टेन्शनच नाही. कारण तु्म्ही रोज जोवणात वापरणाऱ्या मिठामुळे जास्त येणारं तुमचं लाइट बिल कमी होईल. आता हे कसं शक्य आहे, त्यासाठी हा व्हिडीओ पाहा.
फ्रिजमध्ये मिठाची कमाल
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यासाठी तुम्हाला फक्त थोडंस मीठ घ्यायचं आहे. सुरुवातीला फ्रिजमधील फ्रिजर उघडायचा आहे. त्यानंतर जर तुमच्या फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर झाला असेल, तर तो आधी वितळवून घ्या. संपूर्ण फ्रिजर रिकामा करा आणि त्यानंतर थोडसं मीठ घ्या, आता हे मीठ फ्रिजरमध्ये सर्वत्र पसरवा. असं केल्यानं फ्रिजमध्ये बर्फ साठणार नाही, आणि विजेचे बिलही कमी येईल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad: गरम तव्यावर बर्फ-हळद एकत्र टाकताच झाला ‘चमत्कार’; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
तुम्ही सुद्धा हा जुगाड घरच्या घरी अगदी एकही रुपया खर्च न करता करून पाहू शकता. यामुळे फ्रीजमध्ये तयार होणारे बर्फाचे डोंगर तयार होणार नाहीत आणि यामुळे तुमच्या फ्रीजमुळे विजेच्या बिलामध्ये होणारी भरमसाठी वाढही कमी होईल. तुमहीही ही ट्रिक वापरा आणि याचा तुम्हाला फायदा होतो का हे आम्हाला नक्की कळवा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.