Video Shows How To Remove Stains From Rubber Tiffin Gasket : शाळा, कॉलेज, ऑफिसला जाताना आपल्यापैकी अनेक जण घरून डबा घेऊन जातात. त्यामध्ये पोळी-भाजी, वरण-भात, कोशिंबीर, तर कधी खाऊ अशा खाद्यपदार्थांचा समावेश असतो. अनेकदा भाजीमध्ये असणारे तेल डब्यात आणि डब्याच्या झाकणाच्या रबरामध्ये (tiffin gasket) चिकटून राहते आणि कितीही स्वच्छ केले तरीही त्याचे पिवळे डाग काही केल्या जात नाहीत. आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे की, त्यामध्ये पाहून तुम्ही डब्याच्या झाकणाच्या रबरामध्ये असणारे तेल सहज काढून टाकू शकता.

व्हिडीओमधील तेल काढून टाकण्याच्या पायऱ्या खालीलप्रमाणे :

१. सगळ्यात आधी डब्याचे झाकण आणि डब्याच्या झाकणात असणारे रबर काढून घ्या.
२. एका बाऊलमध्ये गरम पाणी घ्या.
३. त्यामध्ये हँड वॉश आणि दोन चमचे बेकिंग सोडा टाका.
४. त्यानंतर डब्याचे झाकण, डबे व रबर त्या पाण्यात व्यवस्थित बुडवून ठेवा.
५. त्या द्रावणात त्या वस्तू पाच मिनिटे तशाच ठेवा आणि बाऊलमधील पाणी काढून टाका.
६. नंतर तुम्हाला डबे, झाकण व रबर आ काही प्रमाणात स्वच्छ झाल्याचे दिसतील.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sudha.lukka या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. लहान मुलांचे टिफिन आणि कंटेनर प्लास्टिकचे असतात. कित्येक घरांमध्ये खाद्यपदार्थ त्यातून दिले जातात. दिसायला छान दिसणाऱ्या या डब्यांमध्ये एखादा जरी डाग राहिला, तर ते दिसायला खराब दिसतात. कारण – प्लास्टिकची भांडी लवकर खराब होतात. विशेषत: प्लास्टिकच्या ताटात, डब्यात अन्न खाल्ल्यानंतर त्यावर तेल किंवा हळदीच्या खुणा राहतात. त्यामुळे या वस्तू साफ करताना खूप काळजी घ्यावी लागते. जर तुमच्या घरातील प्लास्टिकच्या डब्यावर तेलाचे चिकट, पिवळे डाग असतील, तर तुम्ही ते स्वच्छ करण्यासाठी या टिप्सचा अवलंब करू शकता.

Story img Loader