नुकत्याच झालेल्या एका संशोधनाद्वारे विषाणुच्या सहाय्याने स्तनांचा कर्करोग रोखता येणे शक्य असल्याचे समोर आले आहे. स्तनांच्या कर्करोगाची ट्रिपल नेगेटिव्ह पेशींची वाढ या विषाणुच्या वापरामुळे रोखता येणार आहे. पेन स्टेट वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोगाच्या उपचारादरम्यान प्रभावी ठरू शकणाऱ्या या विषाणुचा अधिक अभ्यास केला जात आहे. हे संशोधन यशस्वी झाल्यास, स्तनाच्या कर्करोगावरील उपचारपद्धतीत मैलाचा दगड ठरू शकते. एएव्ही-२ प्रकारच्या या विषाणुची लागण मानवी शरीरात होऊ शकते, मात्र यामुळे आरोग्याला कोणताही धोका निर्माण होत नाही. स्तनांच्या कर्करोगावरील उपचारपद्धती अत्यंत क्लिष्ट असून, या आजारात उद्भवणाऱ्या अनेक लक्षणांमुळे पेशींमधील कॅन्सर वाढीस लागतो. पेशींमधील कॅन्सरची जोमाने होणारी वाढ उपचारपद्धतीत अनेक अडथळे निर्माण करत असल्याची माहिती पेनसिल्व्हानिया विद्यापीठातील प्राध्यापक क्रेग मेयरेस यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा