Vitamin deficiency chapped lips: हिवाळा ऋतू सुरू आहे. त्यामुळे हिवाळ्यात ओठांची काळजी घेणे फार गरजेचे असते. कारण हिवाळयात ओठं कोरडी होतात. ओठांवरील नाजूक कातडी निघून जाते. त्यावर उपाय म्हणून आपण ओटांना लिप बाम किवा घरगुती नैसर्गिक उपाय केले जातात. मात्र, तरीही आपली ओठ कोरडी होत असेल किवा त्यावरची नाजुक कातडी निघून जात असेल तर नक्कीच शारीरीक उडचण उद्भवली असणार. ओठं फटण्याचं किवा कोरडी होण्याचं नेमकं कारण काय ? हेच आपण आज समजून घेणार आहोत.

थंडीमध्ये ओठ का फाटतात?

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

थंडीमध्ये ओठ कोरडी आणि फाटण्याची अनेक कारणे असू शकतात. महत्वाचे कारण म्हणजे, शरीरात पाण्याची कमतरता असते. बहुतेक लोक हिवाळा चालू झाल्यावर कमी प्रमाणात पाणी पितात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते आणि त्याचा परिणाम त्वचेवर आणि ओठांवर दिसून येतो. म्हणून हिवाळा असो किंवा अजून कोणता ऋतू पाणी जास्त प्रमाणात सेवन केले पाहिजे. हिवाळयात कोरडे वारे देखील वाहतात ओठ कोरडी पडण्याची कारण हिवाळ्यातील हवा देखील असू शकते. म्हणून अशा परिस्थिती हवे मध्ये जाणे टाळणे.

(आणखी वाचा: हिवाळ्यात जिममध्ये न जाता वजन कमी करण्यासाठी फाॅलो करा ‘या’ ट्रिक्स, झपाट्याने होईल वजन कमी )

व्हिटॅमिन ‘बी १२’ च्या कमतरतेमुळे ‘ओठ’ फाटतात

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे तुमचे ओठ जलद गळू शकतात. खरंच, विशेषतः व्हिटॅमिन बी-12 (रिबोफ्लेविन) मुळे ओठ फुटू शकतात. हे प्रत्येक ऋतूमध्ये राहू शकते आणि शरीरात त्याची कमतरता सतत असू शकते. याला वैद्यकीय परिभाषेत अँगुलर चेइलाइटिस असेही म्हणतात, ज्यामध्ये ओठांची गंभीर आणि अत्यंत अस्वस्थ स्थिती दिसून येते. यामध्ये तुम्हाला ओठांच्या कोपऱ्यात त्वचेला तडे आणि फोडही जाणवू शकतात.

ओठ फाटण्यावर उपाय – ‘हे’ पदार्थ सेवन करा

आपल्या आहारात व्हिटॅमिन बी १२ समृद्ध नैसर्गिक पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. जर दैनंदिन गरजा आहाराने पूर्ण होऊ शकत नसतील, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर चांगला आहार निवडू शकता. व्हिटॅमिन बी १२ चे मुख्य स्त्रोत म्हणजे दूध, अंडी, दही, सॅल्मन, मशरूम, आंबवलेले पदार्थ हे आहेत. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही वरील काही पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून आपल्या शरीरामधील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता पूर्ण करू शकता.