Vitamin D Deficiency: पिंपल्स ही एक समस्या आहे जी कोणालाही होऊ शकते. त्वचेतून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तेलाची पातळी वाढते तेव्हा चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तेलाची पातळी वाढल्यामुळे त्वचेच्या पेशींचा विस्तार कमी होतो, त्यामुळे पेशी ब्लॉक होतात. या पेशींमध्ये तेल स्थिर होते. असे मानले जाते की मुरुमांची समस्या तरुणांमध्ये अधिक असते, परंतु तज्ञांच्या मते, ही समस्या ४० ते ५० वर्षे वयाच्या लोकांना देखील होऊ शकते.

हार्मोन्समध्ये होणारे बदल, वाढते प्रदूषण आणि धुळीने माखलेली माती यामुळे चेहऱ्यावर घाण साचू लागते जी पिंपल्सचे रूप घेते. आहारात कॉफी आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यानेही चेहऱ्यावर मुरुमांची समस्या उद्भवू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असली तरी मुरुमांची समस्या होऊ शकते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर मुरुमे का होतात आणि त्यावर उपचार कसे करावे हे जाणून घेऊया.

Karan Veer Mehra reveals he is dyslexic
Karan Veer Mehra : ‘या’ आजारामुळे बिग बॉस १८ चा विजेता करणने शोमधील टास्क वाचण्याचे टाळले; नक्की काय होता आजार? डॉक्टरांकडून घ्या जाणून
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
governor c p radhakrishnan warns poor water quality in rivers like godavari threatens human life
गोदावरीसह काही नद्यांची अवस्था बिकट, राज्यपालांकडून चिंता
Neil Nitin Mukesh
Neil Nitin Mukesh : अभिनेता नील नितीन मुकेश दर दोन तासांनी का खातो? वाचा, तज्ज्ञांनी सांगितले फायदे
Causes of unwanted hair growth
Facial Hair : हनुवटी आणि गालावर भरपूर केस येतात? मग ‘ही’ असू शकतात कारणे; करू नका दुर्लक्ष
Ramphal health benefits In Marathi
Ramphal : रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
One GBS patient detected in Sangli city and five to six in rural areas all receiving treatment in private hospitals
सांगलीत ‘जीबीएस’चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू

(हे ही वाचा: Mucus In Lungs: ‘या’ घरगुती उपायांद्वारे तुम्ही घसा, छाती, फुफ्फुसातील कफ काढून टाकू शकता; जाणून घ्या कसे वापरायचे)

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे मुरुम कशी येतात

व्हिटॅमिन डी हे आरोग्यासाठी उपयुक्त जीवनसत्व आहे, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि हाडे मजबूत करते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा परिणाम त्वचेवरही स्पष्टपणे दिसून येतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर मुरुम येऊ लागतात आणि काही वेळा पिंपल्सही येऊ लागतात.

व्हिटॅमिन डी मुरुमांच्या बॅक्टेरियाला नष्ट करते आणि त्यांना वाढण्यापासून प्रतिबंधित करते. यामुळे त्वचेची जळजळ दूर होते आणि त्वचा निरोगी होते. व्हिटॅमिन डीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्याच्या कमतरतेमुळे पिंपल्स आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. तुम्हालाही मुरुमांचा त्रास होत असेल तर आहारात व्हिटॅमिन डी घ्या.

( हे ही वाचा: Vitamin B7 Deficiency: ‘या’ एका व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुटतात नखे आणि गळतात केस; जाणून घ्या कसे)

व्हिटॅमिन डीची कमतरता कशी भरून काढायची

मुरुमांपासून मुक्ती मिळवायची असेल तर आहारात व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा. आहारात अंडी, गाईचे दूध, दही, मशरूम आणि मासे खा. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम आणि नैसर्गिक स्रोत आहे. सकाळी उबदार सूर्यामध्ये १० ते १५ मिनिटे राहणे पुरेसे आहे. व्हिटॅमिन डी चे सेवन केल्याने तुमचे शरीर निरोगी तर राहतेच शिवाय तुमची त्वचाही चांगली होते. मुरुमांच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी ‘डी’ जीवनसत्त्व घ्यावे.

Story img Loader