Vitamin D Superfoods: सूर्याच्या किरणांमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणामध्ये असते. कोवळ्या उन्हामध्ये चालल्याने शरीरापर्यंत व्हिटॅमिन डी पोहचते असे म्हटले जाते. हाडांना बळकटी यावी यासाठी व्हिटॅमिन डीची मदत होत असते. यामुळे दात देखील मजबूत बनतात. मेंदू आणि मज्जासंस्था यांना त्यांचे काम करण्यासाठी व्हिटॅमिन डीची मदत होत असते. याशिवाय कॅल्शियम आणि फॉस्फरस अवशोषित करण्यासाठीही हा घटक आवश्यक असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्यकिरणे ही व्हिटॅमिन डीचे प्रमुख स्रोत आहे असे मानले जाते. या व्हिटॅमिनसाठी उन्हामध्ये उभे राहताना प्रखर किरणांमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. तेव्हा त्वचेशी संबंधित गंभीर विकार होण्याची शक्यता असते. अशा वेळी उन्हात न जाता व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी काही विशिष्ट पदार्थांचा समावेश आहारामध्ये केला जाऊ शकतो.

फॅटयुक्त मासे (Fatty fish)

सॅल्मन, टूना आणि मॅकेरल अशा काही फॅटयुक्त माश्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी असते. शरीरामध्ये या घटकाची कमतरता झाल्यास हे पदार्थ खाऊ शकता. एका शिजवलेल्या सॅल्मन माश्यामध्ये अंदाजे 450 IU व्हिटॅमिन डी असते.

अंड्यातील पिवळं बलक (Egg yolk)

अंड्याच्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी असते. दररोज एका मोठ्या अंड्यातील बलक खाल्याने शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण संतुलित राहते.

मशरूम (Mushroom)

अतीनील सूर्यकिरणांमुळे मशरूममध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असते. याच्या सेवनामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतो.

फोर्टिफाइड फूड (Fortified food)

दूध, संत्र्याचा रस अशा फोर्टिफाइड फूडमध्ये व्हिटॅमिन डी असते. आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.

आणखी वाचा – उन्हाळ्यात दह्याऐवजी ताक पिणे अधिक फायदेशीर असते का? याबद्दल आयुर्वेद काय सांगते, जाणून घ्या..

कॉड लिव्हर ऑइल (Cod liver oil)

कॉड लिव्हर ऑइल हे लोकप्रिय सप्लीमेंट आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता झाल्यास हे सप्लीमेंट घेतले जाते. एक चमचा कॉड लिव्हर ऑइलमध्ये 450 IU व्हिटॅमिन डी असते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vitamin d deficiency consume these 5 foods rich in vitamin d know more yps
Show comments