दात आपल्या शरिराचा महत्वाचा भाग आहे. दात अन्नाचे तुकडे करतात आणि तुकडे केलेले पदार्थ पोटात गेल्यानंतर त्यांचे सजह पचन होते. तसेच, चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी देखील दात मदत करतात. हसताना देखील दात दिसतात, त्यामुळे दातांची काळजी घेणे गरजेचे आहे. रोज ब्रश केले पाहिजे, तसेच दैनंदिन आहारात आपण काय खातो याकडे लक्ष दिले पाहिजे. चॉकलेट, बिस्किट, यासारखे दातांना चिपकणाऱ्या गोड पदार्थांमुळे दातांना किड लागू शकते, ज्यामुळे वेदना होतात. तसेच, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे देखील दातांच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. जीवनसत्वांच्या अभावाने पायरिया हा आजार होऊ शकते. या आजारात तीव्र वेदाना होतात. कोणत्या जीवनतसत्वांच्या कमतरतेने पायरिया होऊ शकते, याबाबत जाणून घेऊया.
१) जीवनसत्व ब १२
निरोगी दातांसाठी जीवनसत्व ब १२ खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे दात कमजोर होऊ शकतात आणि पुढे जाऊन पायरिया होऊ शकते. यापासून बचावासाठी आहारामध्ये दूध, दुधाने बनवलेले पदार्थ आणि फॅटी फिशचा समावेश करा. या पदार्थांतून दातांना प्रथिने आणि कॅल्शियम देखील मिळेल जे दात मजबूत करण्यात मदत करतात.
(एलॉन मस्कने त्यांच्या फिटनेसबाबत केला खुलासा, उपवासासह सांगितली ‘ही’ औषध)
२) जीवनसत्व क
पायरिया होण्यामागील सर्वात मोठे कारण हे जीवनसत्व क ची कमतरता आहे. जीवनसत्व क आपली रोग प्रतिकार शक्ती सुधारते, तसेच यातील गुण जिवाणूंचा संसर्ग देखील टाळतात. त्यामुळे दात निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्व क महत्वाचे आहे. जीवनसत्व क साठी संतरा, लिंबू आणि द्राक्षांचे सेवन करू शकता.
३) जीवनसत्व ड
मजबूत हाडांसाठी, दातांसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी जीवनसत्व ड महत्वाचे आहे. जीवनसत्व ड मिळवण्यासाठी तुम्ही १५ ते २० मिनिटे उन्हात जा. आहारातून देखील तुम्हाला हे जीवनसत्व मिळते.
(आत्मविश्वासाने देऊ शकाल भाषण, केवळ ‘हे’ उपाय करा, टाळ्यांचा होईल कडकडाट)
दात रोज स्वच्छ करा
पोषक तत्व दातांना आतून मजबूत करतात, मात्र बाहेरील सुरक्षा मिळण्यासाठी त्यांना स्वच्छ ठेवले पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपल्यानंतर ब्रश केले पाहिजे. जेवल्यानंतर गुळल्या केल्या पाहिजे. दात आणि हिरड्यांमध्ये प्लेक जमा होऊ देऊ नका. दातांमध्ये अन्नाचे काही तुकडे फसल्यास डेंटल फ्लॉसच्या वापर करा.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)