स्मार्टफोन घ्यायचा म्हटल्यावर आपल्या खिशाला कात्री लागणार हे ओघानेच आले. यामध्ये फोनचे मॉडेल जितके नवीन तितका तो फोन जास्त महाग असतो. दिवसागणिक बाजारात नवनवीन मोबाईल लाँच होत असताना Vivo कंपनीने एक अनोखी ऑफर लाँच केली आहे. यामध्ये केवळ १०१ रुपये देऊन कंपनी नवीन फोन खरेदी करु शकणार आहे. या ऑफरसाठी कंपनीने बजाज फायनान्सशी भागीदारी केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी मिळून ४१ दिवसांसाठी ही ऑफर जाहीर केली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जाहीर केलेल्या या ऑफरला New Phone, New You असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला १०१ रुपये देऊन Vivo चा नवीन फोन खरेदी करता येणार आहे. तर फोनची बाकी रक्कम ३ हप्त्यामध्ये भरण्याची मुभा कंपनीने दिली आहे. ही ऑफर ३१ जानेवारीपर्यंत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या ऑफरमध्ये १० हजार किंवा त्याहून जास्त किमतीचा फोन खरेदी करता येणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना Vivo आणि बजाज फायनान्सची भागीदारी असलेल्या रिटेल स्टोअरमध्ये जावे लागेल. याठिकाणी फोन नक्की केल्यावर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामध्ये ग्राहकांचा आधारकार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक घेतला जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ग्राहकांना केवळ १०१ रुपये द्यायचे आहेत. मग हा फोन लगेचच तुमच्या मालकीचा होणार आहे. फोनच्या रकमेतून १०१ रुपये कापून घेऊन बाकी रक्कम कंपनी तुमच्याकडून ६ हप्त्यात वसूल करुन घेणार आहे. हे पेमेंट करण्यासाठी तुम्ही एचडीएफसीचे डोबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरले तर झिरो डाऊनपेमेंटवर हा फोन तुम्हाला मिळू शकणार आहे. याशिवाय त्यावर ५ टक्के अतिरिक्त डिस्काऊंटही मिळेल.