स्मार्टफोन बनवणाऱ्या विवो कंपनीने भारतात काही दिवसांपूर्वीच Vivo V15 Pro हा स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने Vivo V15 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. पण हा स्मार्टफोन सध्या केवळ मलेशिया आणि थायलंडसाठी लाँच करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत हा स्मार्टफोन लवकरच उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

V15 Pro प्रमाणे या स्मार्टफोनमध्येही पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि ट्रिपल रिअर कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील बहुतांश फिचर्स हे मूळ म्हणजेच V15 Pro प्रो या मॉडेलनुसारच आहेत. मात्र यातील प्रोसेसर बदलण्यात आलेला आहे. V15 Pro मध्ये कंपनीने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर दिलं आहे. तर V15 मध्ये MediaTek Helio P70 SoC प्रोसेसर देण्यात आलं आहे. तसंच फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत 25 हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.

पॉप-अप कॅमेरा – 
या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा डिस्प्लेच्या मागे लपलेला आहे आणि सेल्फीसाठी क्लिक केल्यानंतर कॅमेरा आपोआप पॉप-अप होतो. हा स्मार्टफोन टोपॉज ब्ल्यू आणि ग्लॅमर रेड कलरमध्ये उपलब्ध असेल, तसंच याच्या वरील बाजूला ग्रेडिअंट फिनिशींग आहे.

फीचर्स –
-डिस्प्ले – 6.39 इंच आकारमानाचा व फुल एचडी प्लस (2316 बाय 1080 पिक्सल्स) क्षमतेचा व 19:5:9 असा अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड डिस्प्ले
-रॅम – रॅम ६ जीबी व इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून, मायक्रो-एसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढविण्याची सुविधा
-कॅमेरा – याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यामध्ये 48, 8 आणि 5 मेगापिक्सल्सच्या तीन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर सेल्फी  आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये पॉप-अप या प्रकारातील 32 मेगापिक्सल्सचा कॅमेरा
-बॅटरी – 3,700 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी

Story img Loader