गेल्या महिन्यातच व्हिवो कंपनीने, मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असलेल्या Vivo Z1 Pro च्या किंमतीत कपात केली होती. तेव्हा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि व्हिवो ई-स्टोअरवर 13,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. आता पुन्हा एकदा कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली असून हा फोन आता 12,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही किंमत 4GB/64GB व्हेरिअंटसाठी आहे. तर, 6जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 13,990 रुपये आणि 15,990 रुपये झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा- Airtel चे तीन शानदार प्लॅन , अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 2GB पर्यंत डेटा

इन-डिस्प्ले कॅमेरा या फीचरसह सोनिक ब्ल्यू, सोनिक ब्लॅक आणि मिरर ब्लॅक अशा तीन रंगाचे पर्याय या फोनसाठी देण्यात आले आहेत. मल्टिटास्किंगमध्ये अर्थात एकाच वेळी अनेक अॅप्लिकेशनचा वापर करण्यात हा फोन अग्रेसर असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Vivo Z1 Pro स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एसडी 712 प्रोसेसर असून डेडिकेटेड AI बटण आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील 16 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 व 2 मेगापिक्सलचे अन्य कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला असून याला पंच होल डिस्प्लेच्या डिझाईनमध्ये फिट करण्यात आलेले आहे. कॅमेऱ्याद्वारे दर्जेदार प्रतिमा घेता येणार असून यात फोर-के व्हिडीओचा सपोर्टही दिलेला आहे. यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह तब्बल 5 हजार मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ओएस 9 हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo z1 pro price cut in india check features offers sale price availability sas
Show comments