व्होडाफोन आयडिया लिमिटेडने (व्हीआयएल) नवीन पोस्टपेड प्लॅन बाजारात आणला आहे. सर्व योजना कॉर्पोरेट ग्राहकांसाठी असणार आहेत. नवीन प्लॅनची किंमत २९९ रुपयांपासून सुरू करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोबाईलच्या डेटा वापराविषयी कोणतीही मर्यादा नसेल. याशिवाय या प्लॅनबरोबर अनेक फायद्याच्या ऑफर देखील करण्यात येत आहेत.

‘हे’ प्लॅन किती रुपयांचे व कसे असणार आहेत?

१) २९९ रूपयांचा प्लॅन -Vi कंपनीने २९९ रुपयांपासून हा प्लॅन सुरू केला आहे. या प्लॅनमध्ये ३० GB डेटा उपलब्ध करण्यात आला आहे.

२) ३४९ रुपयांचा प्लॅन – ३४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ४० GB डेटा देण्यात आला आहे.

३) ३९९ रूपयांचा प्लॅन – ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ६० GB डेटा देण्यात आला आहे.

४) ४९९ रूपयांचा प्लॅन – ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० GB डेटा देण्यात आला आहे.

‘बिजनेस प्लस प्लॅन’चे फायदे

  •  या प्लॅनमध्ये तुम्हाला मोबाईलमधील डेटा सेक्युरिटी देखील मिळणार आहे.
  • मोबाईलच्या लोकेशन ट्रॅकिंगमुळे अनेकदा डेटा चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या प्लॅनमध्ये सॉल्युशन व डेटा सेक्युरिटी देखील देण्यात आली आहे.
  • कॉर्पोरेट ग्राहक या प्लॅनद्वारे पुढील बिलिंग सायकलनंतर नवीन बिजनेस प्लस प्लॅनमध्ये अपग्रेड करू शकणार आहेत.
  • या अनेक प्लॅनमध्ये ग्राहकांना Vi मूव्ही आणि टीव्ही डीज्नी तसेच हॉटस्टार व्हीआयपी एक वर्षासाठी देण्यात आला आहे.
  • या प्लॅनबरोबर प्रोफाइल ट्यून, कॉलर ट्यून तसेच तुम्ही ऑफिसच्या बाहेर असाल तेव्हा प्री-रेकॉर्ड केलेला मेसेज सेट करण्याचा एक पर्याय देखील देण्यात आला आहे.

Story img Loader