ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेची घोषणा केली आहे. ग्राहकांना काहीतरी नवं द्यावं यासाठी कंपनीने एक गेमिंग कॉन्टेस्ट आयोजीत केला आहे. ‘The Vodafone Travel Passport’ असं या स्पर्धेचं नाव असून मायव्होडाफोन अॅपद्वारे या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. एका महिन्यापर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार असून आजपासून याची सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला मोफत दुबईची यात्रा करण्याची संधी मिळणार आहे.
ग्राहकांना आपल्यासोबत कायम ठेवण्यासाठी व्होडाफोनने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी व्होडाफोनने ‘ईजीमायट्रिप’सोबत भागीदारी केली आहे. याद्वारे ग्राहकांनी पर्यटन स्थळं शोधायची आहेत. लपलेलं पर्यटन स्थळ शोधल्यास विजेत्याला रोज ‘ईजीमायट्रिप’कडून 400 रुपयांचं कुपन देण्यात येईल. तसंच विजेत्याला भारतातील कोणत्याही ठिकाणी तीन दिवस आणि दोन रात्री हॉटेलमध्ये मोफत राहण्याची संधी आहे. तर संपूर्ण स्पर्धा संपल्यानंतर एका भाग्यशाली विजेत्याला दुबईच्या यात्रेचं पॅकेज जिकण्याची संधी आहे. पोस्टपेड आणि प्री-पेड अशा दोन्ही ग्राहकांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे.