रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं आपल्या १९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये बदल केला आहे. कंपनीकडून या प्लानमध्ये पहिलेच्या तुलनेत आता जवळपास दुप्पट डेटा मिळणार आहे.

याआधी १९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.४ जीबी २जी/३जी/ ४जी डेटा मिळायचा. पण आता यूजर्सना दररोज २.८ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच २८ दिवसांसाठी ७८.४ जीबी डेटा मिळणार आहे. याचाच अर्थ १९९ रुपयांच्या अपग्रेडेड प्लानमध्ये १ जीबी डेटाची किंमत २.५३ रुपये होते. मात्र, हा प्रीपेड प्लॅन केवळ निवडक व्होडाफोन सब्सक्राइबर्ससाठीच उपलब्ध आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे युजर्सही या ऑफरचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

या प्लॅनअंतर्गत युजरला दररोज २.८ जीबी डेटा , अमर्यादित व्हॉइस कॉल्स सुविधा मिळेल. अमर्यादित कॉल्ससाठी २५० मिनिट दररोज व १००० मिनिट दर आठवड्याला अशी मर्यादा असेल. पण एसएमएसची सुविधा या प्लॅनअंतर्गत मिळणार नाही. यापूर्वीच्या १.४ जीबीच्या प्लॅनमध्ये १०० एसएमएस युजरला दररोज वापरासाठी मिळत होते.

Story img Loader