प्रतिक्षा केल्याने माणसाच्या प्रवृत्तीमधील सहनशीलतेमध्ये वाढ होते. तसेच याचा चांगले आर्थिक निर्णय घेण्यातही मदत होत असल्याची माहिती अभ्यासातून समोर आली आहे.
‘चिकागो बुथ बिझनेस’ विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात, व्यक्तींमध्ये वाट पाहण्याची जेवढी जास्त क्षमता असते. अशा व्यक्तींची सहनशीताही तेवढीच जास्त असते. तसेच योग्य निर्णय घेण्यात त्यांच्या या क्षमतेमुळे मदत होते.
“सध्या सर्वांचा वर्तमानात सर्व गोष्टी झटपट व्हाव्यात याकडे कल असतो. भविष्यात म्हणजेच काही वेळ थांबून त्याच गोष्टी पूर्ण होण्याकडे कोणाचाही भर नसतो. परंतु, माझ्या अभ्यासानुसार ज्या व्यक्तींमध्ये प्रतिक्षा करण्याची क्षमता जास्त असते तेच एखाद्या गोष्टीवर योग्य निर्णय घेतात आणि निर्णयाचा अपेक्षित मोबदलाही त्यांना मिळतो.” असे संशोधक फिशबॅच यांनी म्हटले.

Story img Loader