आठवड्यामध्ये केवळ सात तास चालण्याचा व्यायाम केल्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता १४ टक्क्यांनी कमी होते. मात्र, रोज थोडा व्यायाम केल्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचा दावा एका भारतीय वंशाच्या अमेरीकी शास्त्रज्ञाने केला आहे.
मासिक पाळी येणे थांबलेल्या ७३,६१५ महिलांवरील आरोग्य विषयक नोंदींवरून हा अभ्यास करण्यात आला आहे. या पैकी ज्या महिला आठवड्यामध्ये सात तास चालत होत्या व शरीराला व्यायाम होणाऱ्या कामांमध्ये व्यस्त होत्या त्यांच्या मध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी झाल्याचे या संशोधकांना आढळले.
“आम्ही व्यायामामुळे मुख्यतो चालण्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो असे परिक्षण केले,” असे अटलांटा येथील अमेरिकी कर्करोग संस्थेचे(एसीएस) वरिष्ठ साथरोगशास्त्रज्ञ अल्पा पटेल म्हणाले.
“रोज चालणाऱया ६० टक्के महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे धोके टळले होते. इतर कोणत्याही अवघड व्यायामाशिवाय केवळ चालण्यामुळे कर्करोगाचा धोका टळण्यास मदत होते हे समजताच आम्हाला आनंद झाला,” असे पटेल पुढे म्हणाले. दररोज एक तास व्यायाम करणाऱया महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका २५ टक्के टळला असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. या निरीक्षणांसाठी ५० ते ७५ वर्षे वयाच्या महिलांच्या नोंदी घेण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा