Walnuts vs Almonds: Which is better: आपला मेंदू हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पेशींच्या मदतीने मेंदू संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. आपला मेंदू कार्य कसे करावे याचे आदेश देतो. अशा परिस्थितीत मेंदूशी संबंधित समस्या आपल्या संपूर्ण शरीरावर आणि जीवनावर परिणाम करू शकतात, त्यामुळे मेंदूला निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे. मात्र, आपल्या जीवनशैलीमुळे असे अनेकदा होत नाही. आपल्या जेवणात आणि दैनंदिन जीवनात काही सवयी असतात, जे नकळत आपल्या मेंदूला खूप हानी पोहोचवत असतात. त्याचा आपल्या स्मरणशक्तीवर, विचार करण्याची क्षमता, एकाग्रता इत्यादींवर खूप मोठा प्रभाव पडतो. त्या हानिकारक सवयी मोडणे अत्यंत आवश्यक आहे.
अशा परिस्थितीत मेंदूच्या आरोग्यासाठी अक्रोड आणि बदाम या दोनपैकी कोणते पर्याय चांगले आहे हे जाणून घ्या.
अक्रोड आणि बदाम या दोनपैकी कोणते चांगले आहे?
अक्रोड आणि बदाम दोन्ही मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. या दोन्हींमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. अक्रोडमध्ये आवश्यक फॅटी ॲसिड भरपूर असतात. हे मेंदूसाठी खूप चांगले असतात. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ईचे प्रमाण कमी असते. तसेच बदामामध्ये प्रथिने आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते आणि ते मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात. मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी यापैकी कोणते खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेऊया.
अक्रोड खाण्याचे फायदे
अक्रोडमध्ये निरोगी फॅट्स असतात, ज्यात हृदय-संरक्षणात्मक गुणधर्म असतात. याशिवाय अक्रोडमध्ये ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असते. ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉल वाढवून आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करून सूज कमी करण्यास, रक्तदाब कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत करतात. अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते. अक्रोड हे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगले असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे मेंदूच्या कार्यामध्ये मदत करते. अक्रोडाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती कमी होणे टाळता येते (जे सहसा वयानुसार होते). काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की ओमेगा-३ स्मृती आणि मेंदूचे कार्य सुधारते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यासाठी हे उपयुक्त आहेत. अक्रोडामुळे हृदयाचे आरोग्य मजबूत होते. तसेच खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूचे कार्य निरोगी ठेवण्यास मदत होते.
बदाम खाण्याचे फायदे
बदामामध्ये असलेले फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. हे फॅट्स कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, बदाम हे व्हिटॅमिन ईचा एक चांगला स्रोत आहे, जो पेशींचे नुकसान रोखून हृदयाचे संरक्षण करतो.
सोप्या भाषेत सांगायचे तर बदामामध्ये कॅलरी आणि फॅट कमी असते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. ते मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि स्मरणशक्ती वाढवते. बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम न्यूरोट्रांसमीटर क्रियाकलापांसाठी चांगले आहे, यामुळे मेंदूतील माहितीचा प्रवाह सुनिश्चित होतो. स्मरणशक्ती वाढते. बदाम खाल्ल्याने एकाग्रता आणि विचारांची स्पष्टता वाढते. बदामामध्ये असलेले प्रथिने, निरोगी चरबी आणि फायबर दीर्घकाळ ऊर्जा देतात, त्यामुळे मेंदू सक्रिय राहण्यास मदत होते. संशोधनात असे दिसून आले आहे की, या दोन्हीच्या सेवनानं केवळ मेंदूची क्रियाच सुधारत नाही तर स्मरणशक्ती वाढवण्यासही मदत होते.
संशोधन काय म्हणते?
अक्रोड आणि बदाम दोन्ही मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. अक्रोडमध्ये ओमेगा-३ आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. या दोन्हीचे दररोज सेवन केल्याने मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळतात, म्हणून मेंदूला तीक्ष्ण आणि निरोगी ठेवण्यासाठी संपूर्ण निरोगी आहाराचा भाग म्हणून दररोज अक्रोड आणि बदाम दोन्ही खाणे चांगले आहे.