रोज सात वेळा भाज्या व फळे सेवन केली तर मृत्यूची जोखीम ४२ टक्के कमी होते. कर्करोगाचा धोका २५ टक्क्यांनी तर हृदयरोग व पक्षाघाताचा धोका ३१ टक्क्यांनी कमी होतो, असे दिसून आल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. या संशोधनात ६५००० लोकांची निवड यादृच्छिक पद्धतीने करण्यात आली. त्यात ३५ वर्षे वयोगटातील लोकांची निवड करण्यात आली होती. त्यात सरासरी साडेसात वर्षांच्या कालांतराने त्यांच्यातील मृत्यूच्या कारणांची नोंद घेण्यात आली. या पाहणीतील प्रतिसादकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकांनी आदल्या दिवशी फळे व भाज्या यांची चारपेक्षा जास्त सेवने घेतली होती. निरीक्षणकाळात यातील ४३९९ लोक मरण पावले, त्यांचे विश्लेषण केले असता फळे व भाज्या यामुळे हृदयरोग, पक्षाघात व इतरही अनेक रोगांनी होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होते. भाज्या व फळे यांच्या सेवनाने रोगांपासून जास्त संरक्षण मिळते. फळांपेक्षाही भाज्या याबतीत जास्त फायद्याच्या असतात. रोज दोन-तीन वेळा भाज्यांचे सेवन केले असता मृत्यूची शक्यता एकोणीस टक्क्यांनी कमी होते, तर फळांनी ती दहा टक्क्यांनी कमी होते. सॅलड व भाज्यांमुळे आरोग्याच्या तक्रारी १२ ते १५ टक्के कमी होतील, गोठवलेल्या भाज्या व फळे यामुळे मृत्यूची जोखीम उलट १७ टक्क्यांनी वाढते. लिव्हरूल विद्यापीठाच्या डॉक्टरांच्या मते ही मोठी चिंताजनक बाब आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये राष्ट्रीय आहार मार्गदर्शक तत्त्वे सुधारावी लागणार आहेत. भाज्या व फळे यांनी आरोग्य सुधारते हे खरे असले तरी प्रयोगाच्या वेळी काही लोक अगोदरच आरोग्यविषयक काळजी घेणारे असू शकतात. ब्रिटनच्या सध्याच्या तत्त्वानुसार रोज भाज्या व फळांचे पाच सìव्हग आवश्यक आहे. गोठवलेल्या फळातील साखर हे मृत्यूच्या जोखमीचे एक महत्त्वाचे कारण आहे असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या कॅनिंग केलेली व गोठवलेली फळे खाण्याचे मार्गदर्शक तत्त्व आहे ते काढून ताजी फळे व भाज्या यांचे सेवन दिवसातून पाच वेळा करावे अशी सूचना केली जाणार आहे.

Story img Loader