Best exercises for hair: केस आपल्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळेच प्रत्येकाला लांब, दाट आणि मजबूत केस हवे असतात. परंतु, हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना केस गळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून लोक बाजारातून महागडे पदार्थ विकत घेतात आणि केसांच्या वाढीसाठी वापरतात. मात्र, अनेक वेळा ही रासायनिक उत्पादने केसांना फायदा देण्याऐवजी नुकसान करू लागतात. अशा स्थितीत तुम्हाला हवे असल्यास केसांच्या वाढीसाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतींची मदत घेऊ शकता.
अनेक व्यायाम आणि योगासने आहेत, ज्यांच्या नियमित सरावाने केस नैसर्गिकरित्या लांब, मजबूत आणि जाड होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला याच योगासनांबद्दल माहिती देणार आहोत.
शशांकासन
केसांच्या वाढीसाठी शशांकासन करू शकता. या योगासनांना शशांकासन किंवा ससा आसन असेही म्हणतात. योगतज्ज्ञ म्हणतात की, शशांकासनाच्या नियमित सरावाने विशेषतः महिलांमध्ये हार्मोन्स संतुलित करण्यास मदत होते, ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. याव्यतिरिक्त या आसनामुळे टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते.
शशांकासन कसे करावे?
हे आसन करण्यासाठी आधी जमिनीवर गुडघे टेकून बसा.
आता दोन्ही हात हवेत वर करा, दीर्घ श्वास घ्या आणि कंबर पुढे वाकवून तळहाताच्या साहाय्याने जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
म्हणजेच या स्थितीत तुमची बोटे, कोपर, नाक आणि तळवे यांचा जमिनीला स्पर्श करा.
काही वेळ या स्थितीत राहा आणि नंतर श्वास सोडत परत सरळ बसा.
हे आसन तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार पाच-सहा वेळा करू शकता.
हेही वाचा: सकाळीच नाही रात्रीदेखील आवळा खाण्याचे अनेक फायदे; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
उत्तानासन
केसांच्या वाढीसाठी उत्तानासन खूप फायदेशीर मानले जाते. या योगासनांना उंट पोझ असेही म्हणतात. योगतज्ज्ञांच्या मते, उत्तानासनाचा सराव डोके आणि केसांच्या छिद्रांमध्ये रक्त परिसंचरण वाढवते, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते. यामुळे केस गळणे थांबते आणि केसांची वाढही वेगवान होऊ लागते.
उत्तानासन कसे करावे?
उत्तानासन करण्यासाठी दोन्ही पाय जोडून सरळ उभे रहा.
आपले दोन्ही हात पायाच्या घोट्यावर ठेवा.
त्यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि आपली कंबरेत वाका.
या आसनात तुमची छाती पायांना स्पर्श करत राहील.
मांड्या आतून दाबण्याचा प्रयत्न करा आणि टाचांवर शरीर स्थिर ठेवा.