कर्करोग हा अतिशय गंभीर आजार आहे. यामुळे रुग्णाच्या शारीरिक क्षमतेवर तर परिणाम होतोच, मात्र त्याचबरोबर त्यांच्यावर मानसिक आघातही होतो. महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा कर्करोगाचा सामान्य प्रकार असून याचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. एक अभ्यासमध्ये असे आढळून आले आहे की शहरी भागातील आठपैकी एक महिला या आजाराने ग्रस्त आहे. या आजारबद्दल लोकांच्या मनात प्रचंड भीती आहे. मात्र या गंभीर आजारतून बरे होणे शक्य आहे.
कर्करोग या आजारचे वेळेत निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करणे शक्य आहे. चेंबूर येथील एसआरव्ही हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, डॉ मेघल संघवी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी स्तनाच्या कर्करोगाची काही प्राथमिक लक्षणे सांगितली आहेत.
स्तनच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे
- स्तनामध्ये वेदनारहित गाठ
- पूर्वीच्या तुलनेत स्तनांच्या आकारामध्ये असमानता
- स्तनावरील त्वचा जाड होणे आणि स्तनाग्रातून रक्त येणे
वरीलपैकी कोणतीही लक्षणे तुम्हाला दिसत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. वेळेतच ही लक्षणे ओळखल्यास या आजारवर योग्य उपचार करणे शक्य आहे. स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांच्या उपचाराच्या पद्धतीमध्ये सामान्यतः शस्त्रक्रियेचा समावेश असतो. यामध्ये स्तन संवर्धनच्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे. या शस्त्रक्रियेमुळे मिळणारे परिणाम हे अतिशय सकारात्मक आणि कमी गुंतगुंतीच्या जोखीमेशी संबंधित आहे. काही प्रकरणांमध्ये रुग्णाच्या परिस्थितीनुसार शस्त्रक्रियेच्या पद्धतीची शिफारस केली जाऊ शकते.
काही निवडक प्रकरणांमध्ये केमोथेरिपी टाळता येऊ शकते. तसेच रेडिएशन थेरिपीमध्ये केवळ बाधित भागावर विकिरण केले जाते त्यामुळे इतर अवयवांवर याचा कमी प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे इम्युनोथेरपी आणि हार्मोन थेरपीचेही दुष्परिणाम नगण्य आहेत. डॉ मेघल संघवी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, वयाच्या ३० वर्षांपूर्वी गर्भधारणा, बाळाला कमीत कमी सहा महीने स्तनपान करणे, वारंवार केली जाणारी हार्मोन थेरपी टाळणे, धुम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन न करणे त्याचबरोबर निरोगी जीवनशैलीचे पालन करणे, अशा गोष्टी करून आपण स्तनाच्या कर्करोगाचा धोका काही अंशी कमी करू शकतो. तसेच, २५ वर्षांवरील महिलांनी मासिक स्वयं-स्तन परीक्षण करणे आणि दर १२ ते १८ महिन्यांनी मॅमोग्राफी केल्यास स्तनाचा कर्करोग शोधणे खूप सोपे होईल.
स्तनच्या कर्करोगाच्या लक्षणांचे वेळेत निदान झाल्यास,
- आजारातून बरे होण्याची शक्यता वाढते.
- उपचारांचे प्रमाण किंवा कालावधी कमी होऊ शकतो.
- उपचारांचा खर्च आणि कुटुंबावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत
रात्री शांत झोप लागत नाही? वापरा ४-७-८ ब्रीदिंग टेक्निक; मिनिटांमध्ये लागेल गाढ झोप
महिला या प्रत्येक कुटुंबाचा कणा असतात. मात्र जेव्हा याच महिलेला कर्करोगाचे निदान होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ढासळते. यावेळी एकमेकांना मानसिक आधार देणे जास्त गरजेचे आहे. यावेळी संपूर्ण कुटुंबाने या स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. या आजाराशी लढण्यासाठी रुग्णात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने केल्यास रुग्णाला या आजारावर मात करण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते.