Weight gain : जगात वजन कमी करू इच्छिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अनेकजण वेगवेगळ्या मार्गाने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण असे देखील लोक आहेत जे वजन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत , पण त्यांचे वजन काही केल्या वाढत नाहीये. जर कोणाला वजन वाढवायचे असेल तर त्याने आपल्या आरोग्याची काळजी घेत वजन वाढविले पाहिजे. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल आणि वजन वाढवण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही या ४ गोष्टी दुधात मिसळून पिऊ शकता. ज्यामुळे तुमच्या वजनात नक्कीच वाढ होईल.

कॅल्शियमसोबतच दुधामध्ये कॅलरी, प्रथिने आणि इतर पोषक घटकही चांगल्या प्रमाणात आढळतात. वजन वाढवण्यासाठी लोक विशेषतः दुधाला आहाराचा भाग बनवतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण वाढवण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी मिसळल्या जातात, ज्यामुळे शरीराचे वजन वाढण्यास मदत होते. वजन वाढवण्याचा दुध हा एक चांगला आणि नैसर्गिक मार्ग आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रासायनिक सप्लिमेंटची गरज भासणार नाही.

केळी

दुधात दोन केळी घालून बनवलेला केळीचा शेक शरीराचे वजन वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. विशेषतः गाईचे दूध पिणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला हवे असल्यास दुधात बदाम किंवा इतर कोणताही ड्रायफ्रूट घालूनही खाऊ शकता.

खजूर

खजूर फायबर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. दुधात खजूर मिसळून किंवा दुधासोबत साधे खजूर खाल्ल्याने शरीराला पोषण मिळते. त्यामुळे वजन वाढण्यात नक्कीच मदत होते. मात्र , खजूर उकळून दुधात मिसळून प्यायल्यास जास्त फायदा होतो.

मध

मध आणि दूध हे उत्तम मिश्रण मानले जाते. हे प्यायल्याने वजन नक्कीच वाढायला सुरुवात होईल. दुधासोबत मधामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही चांगले असते जे मांसपेशी वाढवण्यासाठी चांगले असते.

अंडी

दुधात अंडे घालून प्रत्येकाला जमत अस नाही. अंड्याचा वास येताच अनेकांची नाक मुरडू लागतात. परंतु, अंड्यामध्ये प्रथिने जास्त असल्याने ते दुधात मिसळून प्यायल्यास शरीराचे वजन झपाट्याने वाढते.

(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आवशक्यता असल्यास नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)