Monsoon Tips: पावसाळा सुरु झाला आहे. आता या काळात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मन प्रसन्न होत. कित्येकांना पाऊस आवडतो ही पण या ऋतूमध्ये वेगवेगळे किडी देखील घरामध्ये शिरतात. काही किडे उडणारे असतात तर काही सरपटणारे किडे असतात. असेही किडे असतात जे फक्त ट्युबलाइट किंवा बल्बकडे आकर्षित होतात आणि घराच्या भिंतीवर फिरत राहातात. या किड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टीप्स येथे दिल्या आहे. या टिप्स वापरल्यानंतर तुमच्या घरामध्ये हे किडे येऊ शकणार नाही आणि तुम्हाला अगदी सहज या किड्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊ या कशी मिळवावी या किड्यांपासून सुटका मिळेल.
पावसाळी किड्यांना घरापासून दूर कसे ठेवायचे
१. या पावसाळी किड्यांना घरात येण्यापासून रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे संध्याकाळी घराच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करणे. खिडक्या आणि दरवाज्यांमध्ये जी जागा रिकामी राहते, त्यातही या भेगा भरणे आवश्यक आहे, अन्यथा येथूनही किडे येऊ शकतात.
२. खोलीत प्रकाशाची गरज नसलेल्या ठिकाणी दिवे बंद करा. विशेषतः छताच्या आणि खिडक्यांभोवतीचे दिवे बंद ठेवा. बहुतेक किडे त्यांच्याकडे आकर्षित होतात.
३. किडे दूर करण्यासाठी, लिंबू आणि बेकिंग सोडा यांचे द्रावण तयार करा आणि स्प्रे बाटलीत भरा. हे द्रावण किड्यांवर शिंपडले की किडे पळून जातात.
४.पावसाळ्यातील अनेक किडे काळी मिरीपासून दूर पळतात. काळी मिरी बारीक करून पाण्यात मिसळा आणि नंतर स्प्रे बाटलीत भरून किड्यांवर शिंपडा.
हेही वाचा – तुम्ही तीन दिवस झोपला नाहीत, तर तुमच्या शरीर आणि मनावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
५. घरात जितकी स्वच्छता असेल तितके किडे कमी दिसतील. घाण पाहून बहुतेक किडे घरात येतात.
६. खिडक्या किंवा जाळीदार दारांवर काळे पडदे लावले जाऊ शकतात. स्क्रीन लावल्याने प्रकाश बाहेर दिसत नाही आणि किडे घराकडे येत नाहीत.
७. पेपरमिंट आणि लॅव्हेंडर आवश्यक तेल देखील या पावसाळी किंड्याना दूर ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. हे किड्यांच्या ठिकाणावर शिंपडले जाऊ शकतात
हेही वाचा – किटकांमुळे वैतागला आहात? जाणून घ्या या समस्येवर खात्रीशीर उपाय!
८. कचऱ्याचे डबे बंद ठेवा. डस्टबिनमध्ये काही प्रकारची गळती असेल तर तीही दुरुस्त करा.
९. कडुलिंबाच्या तेलाचा वापर किड्यांना दूर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. किड्यांपासून मुक्त होण्यासाठी, किड्यांच्या तळांवर कडुलिंबाचे तेल शिंपडा.
१०.घरातील झाडे स्वच्छ करा. लहान किडे तिकडे झाडांमध्ये लपून राहतात आणि रात्री बाहेर येतात.