चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला नकळत सर्व वयोगटातील लोकं अनेक आजारांना बळी पडतात. उत्तम आरोग्यासाठी आपला आहार जितका महत्त्वाचा आहे, तितकाच व्यायामही महत्त्वाचा आहे. आपली जीवनशैली निष्क्रिय होत चालेली आहे, एकतर आपण खूप बसतो किंवा आपण बराच वेळ झोपतो. त्यात आपल्याला मोकळा वेळ मिळाला तर मोबाईल किंवा टीव्ही, लॅपटॉप आणि हातात गेम खेळण्यात मग्न होऊन जातो. त्यात गेल्या दोन वर्षात प्रत्येकजण करोनाच्या भीतीने घरातच राहून आपली दैनंदिन कामे करत आहेत. या अशा परिस्थितीत चालणे नाही, व्यायाम नाही, याने तुम्ही नकळत कोणत्या न कोणत्या गंभीर आजारांना बळी पडू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला माहितच आहे की नियमित व्यायाम केला नाही तर काही न खातापिता तुम्ही जाडे होऊ शकतात. असे जीवन तुम्हाला मधुमेह, थायरॉईड आणि रक्तदाबाचे रुग्ण बनवू शकतात. व्यायामाशिवाय तुम्ही टाईप-२ मधुमेह या आजाराला देखील बळी पडू शकता. निरोगी जीवनासाठी व्यायाम करणे किंवा चालणे खूप महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही व्यायाम केले नाही तर तुम्ही कोणत्या आजारांना बळी पडू शकता.

मधुमेह हा आजार होऊ शकतो

चुकीच्या जीवनशैलीमुळे तुम्हाला मधुमेह हा आजार होण्याची शक्यता आहे. मधुमेह हा अयोग्य जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. ज्यामध्ये योग्य आहार नसल्यास आणि व्यायाम न केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. मधुमेहाच्या रुग्णांना साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी चालणे आणि व्यायाम करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ नेहमी देतात.

कुळीथ डाळीचे आरोग्यासाठीचे ‘हे’ फायदे ऐकून तुम्ही आहारात कराल समावेश, जाणून घ्या

लठ्ठपणा वाढू शकतो

तुम्ही जर सतत घरात बसून काम करत असाल आणि त्यात व्यायाम देखील करत नसाल तर तुमच्या कॅलरीज कमी बर्न होतील आणि तुम्ही लठ्ठपणाचे शिकार व्हाल. जर तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर जेवल्यानंतर चाला. तसेच शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर लठ्ठपणा दूर ठेवा.

सांधेदुखी होऊ शकते

निष्क्रिय जीवनशैलीमुळे तुम्हाला हाडे आणि सांधेदुखीची समस्या उद्भवू शकते. जी लोकं व्यायाम करत नाहीत त्यांचे शरीर, पाठ, कंबर किंवा हात पाय दुखण्याची तक्रार करतात. त्यामुळे नेहमी नियमित थोडावेळ तरी व्यायाम करा.

नैराश्याचे शिकार होऊ शकता

व्यायाम न केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. निष्क्रिय जीवन पद्धतीमुळे तुम्ही नैराश्याचे बळी ठरू शकता. तुम्हालाही ताण-तणाव आणि चिंता यापासून दूर राहायचे असेल तर दिवसातून अर्धा तास व्यायाम करा.

हृदयविकाराचा धोका वाढू शकतो

निष्क्रिय जीवनशैलीमुळे तुम्हाला हृदयाचे आजार होऊ शकतात. हृदयाचे आरोग्य लक्षात ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. जर तुम्ही जिममध्ये व्यायाम करत नसाल तर सायकल चालवणे, पायऱ्या चढणे आणि चालणे यासारखे कार्डिओ व्यायाम करा. व्यायामामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to get rid of many decease so should include exercise in your daily routine scsm