How to heal Your Burnt tongue : जेवण शांतपणे खाणे आवश्यक असते. घाईघाईने जेवल्याने खाल्लेले अन्नपदार्थ लवकर पचत नाही. पण काही जण जेवताना खूप घाई करतात आणि तयार झालेले पदार्थ गरमागरम असताना खातात. असे करताना अनेकदा त्यांचे तोंड, जीभ भाजते. बहुंताश लोकांना पदार्थ गरम असताना खाण्याची सवय असते. त्यांनाही सतत जीभ भाजण्याचा अनुभव येत असतो. परंतु जीभ भाजल्यामुळे जेवताना खूप वेदना होतात. यामुळे लोक कमी प्रमाणात जेवतात. जीभ भाजल्यावर काही घरगुती उपाय करता येतात. या उपायांबाबतची माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जीभ भाजल्यावर कोणते घरगुती उपाय करावे?

मध खा.

मध या पदार्थामध्ये असंख्य औषधी गुण असतात. मध खाणे शरीरासाठी फायदेशीर असते. जीभ भाजल्यावर होणारा दाह कमी करण्यासाठी मध खाणे योग्य ठरते. एक चमचा मध जिभेवर ठेवल्याने त्रास कमी होऊ शकतो. ही कृती तुम्ही दिवसातून ५-६ वेळा करू शकता.

दह्याचे सेवन करा.

दही थंड असते. जीभ भाजल्यावर दह्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. जिभेचा जो भाग भाजला आहे, त्यावर दही ठेवल्याने त्रास कमी होऊ शकतो. दह्याचे इतर फायदेही आहेत.

च्युइंगम खा.

आपण जेव्हा च्युइंगम खातो किंवा चघळत असतो, त्या वेळी तोंडामध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात लाळेची निर्मिती होत असते. लाळ जमा झाल्याने जिभेवरील जो भाग भाजला आहे, त्यावर ओलसरपणा टिकून राहतो. यामुळे जिभेची होणारी जळजळ कमी होते.

आणखी वाचा – रुग्ण आणि डॉक्टर दोघांनाही आचारसंहिता हवी का? कशासाठी?

आईस्क्रीम खा.

गरम पदार्थ खाल्ल्याने जर तुमची जीभ भाजली असेल, तर तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता. आईस्क्रीम खाल्ल्याने जिभेवरील सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. आईस्क्रीम खाताना जिभेचा जो भाग पोळला आहे, तो थंड राहतो.