तुमचा मृत्यू केव्हा होणार हे तुम्हाला जाणून घ्यायचयं? मग, हे मोबाईल अॅप वापरून बघा. आपल्या मृत्यूची तारीख आणि वेळ सांगणारा अत्याधुनिक मोबाईल अॅप तयार करण्यात आला आहे.
आयफोनधारक या अॅपच्या माध्यमातून आपल्या मृत्यूची तारीख जाणून घेऊ शकणार आहेत. आयफोनमध्ये समाविष्ट असणाऱया ‘हेल्थकिट टूल’मधून माहिती घेऊन ‘डेडलाईन’ नावाचे हे मोबाईल अॅप तुमच्या मृत्यूची दिनांक ठरवू शकते. आपली उंची, रक्तदाब, झोप आणि दिनक्रमाची थोडक्यात माहिती याची नोंद आयफोनमधील या ‘हेल्थकिट टूल’मध्ये करता येते. ही माहिती आणि तुमच्या लाईफस्टाईल संबंधिच्या काही प्रश्नांच्या आधारावर हे अॅप मृत्यूची अंदाजे तारीख आणि वेळ सांगू शकतो.
“कोणतेही अॅप व्यक्तीच्या मृत्यूची नेमकी तारीख सांगू शकत नाही. पण, हे अॅप आरोग्याचे परिक्षण करते आणि उत्तम आरोग्य राखण्याचे प्रोत्साहन किंवा योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासही सुचवते.” असे अॅप डेव्हलपर जीस्ट एलएलसी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to know when you are going to die