Republic Day 2023 Speech in Marathi : प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतात दरवर्षी २६ जानेवारीला मोठ्या उत्साहात आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. यावर्षी भारत आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सरकारी कार्यालयांपासून शाळा महाविद्यालय सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय प्रजासत्ताक दिन सर्वात मोठ्या उत्साहात शालेय स्तरावर साजरा केला जातो. अनेकांच्या लहानपणीच्या आठवणी या दिवसासोबत जोडल्या आहेत. कारण प्रजासत्ताक दिन जवळ आला की, शाळेत हा दिवस साजरा करण्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असायचा आणि तो आजही तसाच टिकून आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दिनाचं औचित्य साधत शाळा आणि महाविद्याल्यात भाषणं, निबंध स्पर्धा आणि वादविवाद कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या दिवशी विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये भाग घेत असतात. तर अनेकांना यादिवशी नेमकं काय बोलायचं असा प्रश्न पडतो. मात्र आज आम्ही तुमची ही अडचण दूर करणार असून तुम्हाला भाषणाचे विषय आणि तयार भाषण देणार आहोत. शिवाय ते कसे करायचे याची माहितीही या लेखामध्ये देणार आहोत.

हेही वाचा- Republic Day 2023 : जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि इतिहास

भाषण करताना आत्मविश्वासाबरोबर विषयाची निवडही तितकीच महत्वाची आहे. विषय निवडल्यानंतर आपल्या पाल्याचं वय पाहता छोटी वाक्यरचना आणि सोप्या शब्दांची निवड करणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी कठीण शब्दांमुळे अडखळतात. त्यामुळे रोजच्या वापरातील शब्द असतील तर भाषण करणं सोपं होतं. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने श्रोत्यांशी संवाद साधता येतो. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाशी निगडीत विषय असायला हवेत.

हेही वाचा- १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमध्ये फरक काय? तिरंगा फडकावण्याचा मान, नियम व जागा कशा बदलतात जाणून घ्या

भाषणाचे विषय –

  • प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आणि महत्त्व
  • भारतीय संविधानाचा इतिहास
  • तिरंग्याचा इतिहास
  • “जन गण मन…” राष्ट्रगीताची माहिती

भाषण १ –

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक , वंदनीय शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो! आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मला बोलण्याची मोठी संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यानंतर आपलं नाव आणि विषय सांगून भाषणाला सुरुवात करावी.

आपल्या देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण आज येथे जमलो आहोत. प्रजासत्ताक दिनी भाषण करण्याचा मला सन्मान वाटतो. आपल्या देशात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जातो. १९५० मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले हे आपणा सर्वांना माहीत आहे, पण देशाला स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते. या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशाची राज्यघटना लागू झाली. भारत हा एक लोकशाही देश आहे जिथे देशाचे नेतृत्व करण्यासाठी लोक त्यांच्या नेत्याची निवड करतात. डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. १९४७ मध्ये आपण ब्रिटीशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळविल्यापासून आपल्या देशात बरीच प्रगती झाली आहे आणि आपला देश शक्तिशाली देशांमध्ये गणला जात आहे.
आज या संविधानामुळे आपला देश पूर्ण प्रजासत्ताक आहे. लोकशाही देशात राहणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. खऱ्या देशभक्ताप्रमाणे देशाला योगदान देत राहाणं आवश्यक आहे. इतकं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो, धन्यवाद! जय हिंद.

हेही वाचा- Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाच्या मराठी शुभेच्छा देत WhatsApp Status वर शेअर करा ‘ही’ खास ग्रीटिंग्स

भाषण २ –

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक, वंदनीय शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो! आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपण आपल्या राष्ट्राच्या अतिशय खास प्रसंगी येथे जमलो आहोत. आज प्रजासत्ताक दिन आहे. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं. तर २६ जानेवारी १९५० मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले आणि ‘पूर्ण स्वराज्य’ मिळाले. २६ जानेवारी हा दिवस आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचा आहे. १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जाहीर केली. त्यानंतर १९५० मध्ये याच दिवशी भारत प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आला.

प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांमध्ये आनंद, उल्लास आणि नवीन विचारांचा प्रेरणा देणारा असतो. भारतीय नागरिक म्हणून आपण आपल्या देशाबद्दल आपल्याला आदर आहे. आपण यासाठी सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बातम्या वाचल्या पाहिजेत आणि देशात घडणाऱ्या घटना, काय योग्य व अयोग्य घडत आहे, आपले नेते काय करीत आहेत याची माहिती असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण आपल्या देशाचं देणं आहोत ही भावना आपल्या मनात असली पाहिजे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी, गौरवासाठी आणि उन्नतीसाठी सदैव समर्पित राहू, असा संकल्प केला पाहीजे. धन्यवाद जय हिंद!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to make a speech for republic day so know the related topics and detailed layout jap