How To Make Puri Soft: दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे, त्यामुळेच हा सण लोक थाटामाटात आणि उत्साहात साजरा करतात. या विशेष प्रसंगी अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. यामध्ये पुरीचाही समावेश आहे. परंतु, अनेकदा पुरी करताना काहीतरी गडबड होते आणि ती लुसलुशीत होत नाही, त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
पुरी बनवण्याची योग्य पद्धत कोणती?
पुरी बनवण्यासाठी पीठ व्यवस्थित चाळून घ्या. पीठ चाळून घेतल्याने पिठात असलेले कण निघून जातात, त्यामुळे पुरीचे पीठ चांगले मळले जाते.
त्यानंतर पिठात मीठ, ओवा आणि लागेल तसे पाणी ओतून पीठ मळून घ्या.
पीठ मळून झाल्यावर कापडाने १० मिनिटे झाकून ठेवा.
ठरलेल्या वेळेनंतर पुन्हा एकदा हाताने पीठ हलके मळून घ्या.
हेही वाचा: पांढऱ्या आणि लाल तांदळाच्या तुलनेत राजामुडी तांदूळ आहे बेस्ट? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
आता पिठाचे छोटे गोळे करून पुरीच्या आकारात लाटून घ्या. परंतु, पुरी लाटताना कोरड्या पिठाचा वापर करू नका, यावेळी तुम्ही तेलाचा वापर करू शकता.
त्यानंतर पुरी गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्या आणि झाऱ्याच्या साहाय्याने पुरी हलक्या हाताने दाबत राहा; असे केल्याने पुरी पूर्णपणे फुगते.
अशा प्रकारे तुमची मऊ, लुसलुशीत, फुगलेली पुरी तयार होईल.