Want To remove forehead acne Try This Simple Hack : आपल्यातील अनेकांना स्वच्छ, निरोगी त्वचा हवी असते. तर स्वच्छ व निरोगी त्वचेसाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतात. चमकदार त्वचेसाठी खाल्ल्या जाणाऱ्या फळांमध्ये अनेक नावांचा समावेश असला तरी सफरचंद या यादीत सगळ्यात प्रथम आहे. तर सफरचंद मुरुमांसाठी (remove forehead acne) चांगले आहेत का? त्याच्या सेवनाने खरंच फायदा होऊ शकतो का? याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरूच्या ॲस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटलच्या सल्लागार, डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर प्रियंका कुरी यांच्याशी चर्चा केली.

पण, सफरचंद हे फळंच का?

डॉक्टर प्रियंका कुरी म्हणाल्या की, सफरचंद, बेरी, स्ट्रॉबेरी यांसारखी फळे अँटिऑक्सिडंटने समृद्ध असतात आणि त्यामुळे ते निरोगी त्वचेसाठी योगदान देऊ शकतात. फळातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेवरील जळजळ, मुरुम, अकाली वृद्धत्व यांसारख्या गोष्टींपासून तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतात. अनेक फळांमध्ये व्हिटॅमिन सी, मुबलक प्रमाणात असतात; जे कोलेजन उत्पादन आणि त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात. हे पदार्थ एकंदरीत फायदेशीर असले तरी ते मुरुमांवरील जादूई उपाय नाहीत. कारण प्रत्येकाची खाण्याची एक वैयक्तिक पद्धत असते. जसे की आंबे, काही लोकांना आंबे खाल्ल्यावर पुरळ येतात. तर फळांचे सेवन करण्यापूर्वी त्वचेच्या समस्यांसाठी, डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?

हेही वाचा…रात्री झोपताना तुम्हालाही दूध पिण्याची सवय आहे का? मग १५ दिवसातून एकदा अशा प्रकारे करा दुधाचे सेवन; जाणून घ्या डॉक्टरांचे मत

ज्यांना त्वचेच्या समस्या नसतील त्यांनी कपाळ किंवा गालावरील मुरुमांवर (remove forehead acne) उपचार म्हणून दररोज किमान “दोन ते चार सफरचंद” खावेत. तसेच कच्च्या सफरचंदाचे तुकडे किंवा सफरचंदाची पेस्ट त्वचेवर नियमितपणे लावल्याने अनेक फायदे मिळू शकतात; असे डॉक्टर प्रियंका म्हणतात. सर्व फळे अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत असतात. तर त्वचेवर येणारे, जळजळणारे पुरळ अँटिऑक्सिडंट्सद्वारे बरे होऊन जातात आणि अकाली वृद्धत्व किंवा लवकर वृद्धत्वाची चिन्हे टाळण्यास मदत करू शकतात. याच्याव्यतिरिक्त फळांमधील व्हिटॅमिन सी पिगमेंटेशनचा सामना करण्यास मदत करते; ज्यामुळे त्वचेला आतून चमक येते.

निरोगी आतड्यांचा निरोगी त्वचेशी संबंध आहे का?

आतड्याचे आरोग्य त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करते. बॅक्टेरियाच्या असंतुलनामुळे आतड्यात जळजळ होते, त्यामुळे मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे फायदेशीर बॅक्टेरियांनी समृद्ध आतड्यांतील मायक्रोबायोम राखल्याने, मुरुमांची जळजळ कमी करण्यास आणि त्वचेची चमक सुधारण्यास मदत करू शकतात. कपाळावरील पुरळ (remove forehead acne) उही एक सामान्य चिंता आहे, जी विशेषत: किशोरवयीन मुलांमध्ये जास्त दिसून येते. डोक्यातील कोंडा, टाळूवर जास्त तेल, मृत त्वचेच्या पेशी, कपाळाचे केस आदी घटकांमुळे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित केस धुणे आणि ट्रिम करणे या गोष्टीही मुरूम टाळण्यास मदत करू शकतात.