भारतात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे असली तरी तरीही लोकांना परदेशात फिरण्याची इच्छा असते. मात्र, अनेक वेळा योजना बनण्यापूर्वीच फ्लॉप होते. विशेषत: ही योजना केवळ व्हिसाच्या बाबतीतच रद्द केली जाते आणि परदेशात फिरण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहत. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही व्हिसाशिवायही परदेश दौऱ्यावर जाऊ शकता, होय, हे खरंय. असे अनेक देश आहेत ज्या देशांमध्ये तुम्ही व्हिसा शिवाय प्रवास करू शकता. आज आम्ही तुम्हाला असाच काही देशांबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमचं परदेश फिरण्याच स्वप्न पूर्ण होईल. जाणून घ्या यादी.
अलीकडील हेन्ली पासपोर्ट इंडेक्स अहवालात भारत ८७ व्या क्रमांकावर आहे, एक जागतिक पासपोर्ट रँकिंग चार्ट जो आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्राधिकरण (IATA) च्या डेटाचा वापर करून पासपोर्टमध्ये ‘सर्वात मजबूत’ आणि ‘कमकुवत’ आहे. भारताच्या पासपोर्टबद्दल बोलायचे झाल्यास, ६० देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करण्याची परवानगी देते. ज्या देशांमध्ये भारतीयांना ‘व्हिसा-ऑन-अरायव्हल’ प्रवेश आहे त्या देशांमध्ये थायलंड, इंडोनेशिया, मालदीव आणि श्रीलंका यासारख्या आशियाई डेस्टिनेशनचा समावेश आहे.आफ्रिकेत २१ देश आहेत जे भारतीय नागरिकांना ऑन-अरायव्हल व्हिसा देतात.असे करण्यासाठी फक्त दोनच युरोपीय देश आहेत.
(हे ही वाचा: Monsoon Travel Tips: पावसाळ्यात प्रवास करताय? ‘या’ टिप्स फॉलो करा, प्रवास सोयीस्कर होईल)
व्हिसाशिवाय प्रवास करण्यासाठी देशांची यादी येथे पहा
ओशनिया- कुक बेटे, फिजी, मार्शल बेटे, नियू, सामोआ, वानुआतु, तुवालू, पलाऊ बेट, मायक्रोनेशिया
मध्य पूर्व- इराण, ओमान, जॉर्डन, कतार
युरोप- अल्बेनिया, सर्बिया
कॅरिबियन- बार्बाडोस, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, डोमिनिका, हैती, ग्रेनाडा, जमैका, मॉन्टसेराट, सेंट लुसिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, जमैका, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
( हे ही वाचा: सकाळी ‘या’ सवयींनी दिवसाची सुरुवात करा; आरोग्य चांगले राहील)
आशिया- भूतान, इंडोनेशिया, मकाऊ, म्यानमार, श्रीलंका, तिमोर लेस्टे, कंबोडिया, लाओस, मालदीव, नेपाळ, थायलंड
अमेरिका- बोलिव्हिया, एल साल्वाडोर
आफ्रिका- बोत्सवाना, बुरुंडी, कॅप वर्डे बेट, कोमोरो बेट, इथिओपिया, गॅबॉन, गिनी बिसाऊ, मादागास्कर, मॉरिशस, मॉरिटानिया, मोझांबिक, रवांडा, स्नेगल, सियाचल, सिएरा लिओन, सोमालिया, टांझानिया, टोगो, युगांडा, ट्युनिशिया, जिमबावे