Wash Pillow At Home: अलीकडे त्वचेच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. अगदी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला पिंपल, पुरळ असे त्रास जाणवतात. यासाठी आपण तज्ज्ञांकडे जाऊन हजारो रुपयांची औषधे घेत असाल, उत्तम स्किन केअरच्या उत्पादनांवर खर्च करत असाल, प्रामाणिकपणे ठराविक लिटर पाणी सुद्धा पित असाल पण कितीही केलं तरी हे त्रास काही आपला पिच्छा सोडत नाहीत असं वाटतंय का? तर याचं मुख्य कारण तुमच्या बेडरूममध्ये आहे. झोपताना आपला चेहरा तब्बल चार ते पाच तास (कमीत कमी) ज्या उशीवर असतो त्याच उशा अस्वच्छ असल्याने त्वचेला हानी पोहोचू शकते. इतकंच नाही तर क्लिनिकल आणि मॉलेक्युलर ऍलर्जीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, उशीतील धुळीमुळे कमी रोग प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना ऍलर्जी आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता उशा स्वच्छ करायच्या म्हणजे काय? तर धूळ झाडायची, कव्हर बदलायचे, इतकंच हो ना? अजिबात नाही. यामुळे वरचेवर उशी स्वच्छ होत असली तरी त्यातील किटाणू जंतू काही केल्या जात नाहीत. यासाठी तुम्हाला उशी धुण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या घरातील वॉशिंग मशीन किंवा एखाद्या मोठ्या टपात उशी धुवू शकता. यासाठी आपल्याला तीनच गोष्टी लागणार आहेत. या वस्तू कोणत्या व त्यांचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया..

वॉशिंग मशीनमध्ये उशा कशा धुवाव्या?

  • उशीवर लाळ किंवा अन्य डाग असल्यास, तुम्ही ते मशीनमध्ये धुण्यापूर्वी धावावे. तुम्ही 1:1 च्या प्रमाणात बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे द्रावण वापरू शकता आणि नळाच्या पाण्याखाली उशी धुवू शकता.
  • मशीनमध्ये धुताना,गरम पाणी वापरा. डिटर्जंटचा अतिवापर टाळा अन्यथा फेस जाता जात नाही.
  • कापसाच्या गुठळ्या होऊ नये यासाठी उशा ड्रायरमध्ये टाकताना मोज्यामध्ये दोन टेनिस बॉल टाकून ड्रायरमध्ये घाला.
  • कडक उन्हात उशा सुकवा.

हे ही वाचा<< अचानक हृदयाचे ठोके बंद पडल्याने होणारा मृत्यू टाळू शकतं ‘हे’ एक सोपे उपकरण; लॅन्सेटचा अभ्यास काय सांगतो?

वॉशिंग मशीनमध्ये उशा धुणे सुरक्षित आहे का?

तुमच्या उशीच्या प्रकारावर हे उत्तर अवलंबून आहे. अलीकडे बहुतांश उशा या डाउन, कॉटन आणि सिंथेटिक असतात म्हणजेच पाणी किंवा पावडरने धुतल्यास कापूस सडण्याची शक्यता कमी असते. मात्र वॉशिंग मशिनमध्ये मेमरी फोम उशा कधीही धुवू नका. तुम्ही त्याऐवजी मोठ्या टपात पाणी घेऊन हाताने या उशा धुवू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)