तुमच्याकडून काहीतरी चुकले आहे असे तुम्हाला वाटत असेल त्यावेळी निव्वळ हात धुतल्याने तुम्ही सकारात्मक व्हाल असे एका अभ्यामधून समोर आले आहे.
आपण कसा विचार करतो आणि कसे निर्णय घेतो यावर हात धुण्यामुळे प्रभाव पडतो. स्वत:च्या स्वच्छतेचा प्रभाव नकारात्मक वेळी देखील कसा पडतो यावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी असा दावा केला आहे.
संशोधनासाठी निवडलेल्या व्यक्तिंच्या निरिक्षणावरून संशोधक या निष्कर्षाप्रती पोहचले आहेत. कामानंतर हात नधुतलेल्या व्यक्तिंच्या तुलनेमध्ये ज्या व्यक्ती त्यांचे हात धुतात त्या व्यक्ती सकारात्मक आढळल्या असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. ज्या व्यक्तिंनी हात धुवत नाहीत त्यांच्या पुढच्या कामावर देखील नकारात्मक परिणाम झाल्याचे संशोधकानी म्हटले आहे.
जर्मनी स्थित कोलोगनी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. कै.कास्पर यांनी या संशोधनासाठी एकूण ९८ व्यक्तिंना तीन गटांमध्ये विभागून निरिक्षणे नोंदवली. प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दोन गटांना काहीसे कठीण काम देण्यात आले. या कामात अपयश आल्यावर हात धुतलेल्या गटाने पुढील वेळी हे काम आपण निश्चित पूर्ण करू असा आशावाद व्यक्त केला. हात नधुतलेल्या गटामध्ये मात्र नाउमेदी दिसून आली.
कामातील अपयशा नंतर स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या व्यक्ती त्यांच्यातील नकारात्मतेवर मात करतात. यातून कोणत्याही कठीण प्रसंगावर मात करण्याची उमेद मिळ असल्याच्या निष्कर्षाप्रत हा अभ्यास जात असल्याचे मत कास्पर यांनी नोंदवले आहे.
सामाजिक मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्व विज्ञान या नियतकालिकामध्ये हा अभ्यास प्रसिध्द करण्यात आला आहे.             

Story img Loader