सुजाण पालकांनो इकडे लक्ष द्या…तुमचा मुलगा किंवा मुलगी जर दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही बघत असेल, तर त्याचा शब्दसंग्रह कमी होण्याची आणि तो गणितातही कच्चा राहण्याची शक्यता आहे. एका संशोधनातून ही माहिती पुढे आलीये. अमेरिकेतील मॉंट्रिअल विद्यापीठातील प्राध्यापक लिंडा पगानी यांनी यासंदर्भात संशोधन केलेय.
लहानपणापासून दिवसातून जास्तीत जास्त वेळ टीव्ही बघण्याची सवय जर मुलांना लागली, तर त्याचा मुलांच्या लक्ष केंद्रित करण्यावरही परिणाम होतो. त्यामुळे मुलांची ग्रहणक्षमता कमी होऊन त्यांचे लक्ष सातत्याने विचलित होऊ लागते, असे पगानी यांनी आपल्या संशोधनात म्हटले आहे. आपला पाल्य दिवसातून किती वेळ टीव्ही बघतो, याबाबत पालकांनी जास्तीत जास्त दक्ष राहण्याची गरज आहे. अमेरिकेतील बालरोगतज्ज्ञांनी दोन वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पाल्यांनी दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही बघू नये, असे याआधीच म्हटले आहे. दोन तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही बघितला, तर त्याचा मुला-मुलींवर नकारात्मकच परिणाम होतो, असे पगानी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा