Weight loss by Water chestnut : असंतुलित आहार आणि आयोग्य जीवनलशैलीमुळे वजन वाढण्याची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक जीम लावतात, व्यायाम करतात. मात्र काहींना व्यस्त जीवनशैलीमुळे यासाठी वेळ मिळत नाही. आहारामध्ये काही बदल करून वजन कमी करता येऊ शकते. गव्हाच्या पीठाऐवजी शिंगाड्याचे पीठ खालल्यास वजन कमी करण्यात मदत मिळू शकते. हे फळ चविष्ट असून ते पाण्यात तयार होते.
शिंगाड्यातून मिळतात हे पोषक तत्व
शिंगाड्यात वजन कमी करणारे घटक असतात. यामुळे अनेक आहार तज्ज्ञ या फळाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. नवरात्रीच्या उपवासातही लोक या फळाचे सेवन करतात. शिंगाड्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, जीवनसत्व अ, क, कार्बोदके आणि प्रथिने असतात.
(पांढऱ्या पावाचे अधिक सेवन टाळा, आरोग्याला होऊ शकतात ‘हे’ 3 नुकसान)
असे करा शिंगाड्याच्या पीठाचे सेवन
वजन कमी करण्यासाठी शिंगाड्याचे पीठ फायदेशीर ठरू शकते. शिंगाड्याच्या पीठाचे वापर अनेक प्रकारे होऊ शकते. पीठाचे वापर करून चपाती, ढोकळे, पकोडे, पुरी आदी तयार करून त्याचे सेवन करू शकता. बहुतांश आरोग्य तज्ज्ञ नाश्त्यात शिंगाड्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
शिंगाड्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. याच्या सेवाने तुम्हाला दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागत नाही. अतिरिक्त खाण्याचे टळते. याने वजन कमी होण्यात मदत होऊ शकते. शिंगाड्यात ७४ टक्के पाणी असते, याने भूक मंदावते आणि कॅलरी देखील वाढत नाही. शिंगाड्यात कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तुम्ही निश्चिंत शिंगाड्याचे सेवन करू शकता.
शिंगाड्याच्या पिठाचे इतर फायदे
- ज्या लोकांना थायरॉइडशी संबंधित समस्या आहेत त्यांनी शिंगाड्याच्या पिठाने निर्मित पदार्थांचे सेवन केले पाहिजे. पिठातून जीवनसत्व ब ६, आयोडीन मिळते. हे पोषक तत्व थायरॉइड कमी करण्यात मदत करू शकतात.
- नाश्त्यात शिंगाड्याच्या पीठाने बनलेली चपाती खालल्यास शरीरात दिवसभर उर्जा टिकून राहाते आणि सामान्य कामे करण्यात कोणतीही अडचण येत नाही.
- शिंगाड्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, तसेच सोडियम कमी प्रमाणात असते. त्यामुळे, शिंगाड्याचे पीठ रक्तदाब वाढू न देण्यात मदत करते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)