हिंदू धर्माच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे आहे. दिवाळीला ‘दिपावली’ असेही म्हटले जाते. दीपावली हा शब्द संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चारातून तयार झाला आहे. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ आणि “आवली” म्हणजेच ‘ओळ’ म्हणजेच ‘दिव्यांची ओळ’ किंवा ‘दिव्यांची रांग’असा शब्दाचा अर्थ होतो. आता दिवा म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर पटकन एखादी पणती येईल ज्यात तेल टाकले आहे आणि कापसाची वात लावून ज्योत पेटवली जाते. सर्वसाधरणपणे कोणत्याही दिवा लावायचा झाल्यास त्यात तेल किंवा तूप वापरून कापसाची ज्योत पेटवली जाते कारण तेल हा ज्वलनशील पदार्थ आहे. पण तुम्ही कधी पाणी वापरून लावलेले दिवे पाहिले आहेत का? तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल कारण पाणी आग शमविणारा पदार्थ आहे. पण आता या दिवाळीला तुम्ही पाण्यावर जळणारे दिवे लावू शकता त्यासाठी येथे एक हटके जुगाड सांगितला आहे तो एकदा नक्की वापरून पाहा. या जुगाडमुळे तुम्ही जास्त तेल देखील वापरावे लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या कसा पेटवावा पाण्यावर जळणारा दिवा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा