उच्च रक्तदाब हे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येते. त्यास नियंत्रणात न ठेवल्यास ते आरोग्याला धोकादायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देतात. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, आहारानेच नव्हे, तर पाण्याने देखील उच्च रक्तदाब नियंत्रणात आणता येऊ शकते. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी पाणी कसे फायदेशीर ठरते याबाबत जाणून घेऊया.
१) हायड्रेटेड राहा
निरोगी आरोग्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी असणे गरजेचे आहे. डिहायड्रेशन आणि उच्च रक्तदाबामध्ये संबंध असल्याचे सांगितले जाते. योग्य प्रमाणात पाणी पिल्यास आपले शरीर हायड्रेटेड राहील. शरीर हायड्रेटेड राहिल्याने हृदय चांगल्या प्रकारे काम करते. याने रक्ताभिसरण देखील चांगल्याने होते. या उलट शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास, म्हणजेच डिहायड्रेशन झाल्यास हृदयाला रक्ताभिसरण करणे कठीण जाते.
(वाईन ही हृदयासाठी.. आहार तज्ज्ञ रुजुता यांचा मजेदार सल्ला, वाचून पोट धरून हसाल)
२) रोज किती पाणी प्यावे
अहवालांनुसार, महिलांनी दररोज ११ कप म्हणजेच २.७ लिटर पाणी पिले पाहिजे. तर पुरुषांनी दररोज १५ कप म्हणजेच ३.७ लिटर पाणी पिले पाहिजे. काही फाळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यांच्या सेवनाने देखील शरीर हायड्रेटेड राहाते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यात मदत होते.
३) योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे
हृदय रोग, रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे. अहवालांनुसार, पाण्यात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम मिसळून पिल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यात मदत होऊ शकते. यासाठी पाण्यात पुदिना, लिंबू मिसळून तुम्ही पिऊ शकता. याने उच्च रक्तदाब निंयत्रणात आणण्यात मदत होऊ शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)