Water tank cleaning tips: पावसाळा सुरू झाला की नागरिक आरोग्याकडे जरा जास्तच लक्ष देतात. पावसाळ्यात सावधगिरी बाळगून पिण्याचे पाणी आपण उकळून पितो त्याचप्रमाणे आपण घरातली पाण्याची टाकीदेखील स्वच्छ करतो. प्रत्येकाच्याच घरी पाण्याची टाकी असल्याने ती नियमित स्वच्छ करणे गरजेचे असते. तसंच पावसाळ्यात टाकी स्वच्छ न केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. या दिवसांत दूषित पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गंभीर आजार ओढावू शकतात.
धावपळीच्या आयुष्यात वेळेअभावी पाण्याची टाकी स्वच्छ करण्याकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करत असतो. परंतु यामुळे अनेकदा टाकीमध्ये जाड थर तयार होतो, आणि त्या पाण्याला वास येऊ लागतो व त्यामुळे टाकीतले पाणी दूषित होऊ शकते.
पाण्याची मोठी टाकी साफ करणं म्हणजे फार कसरत करावी लागते असं अनेकांना वाटत. टाकीत उतरून किंवा आतून टाकी स्वच्छ व्हावी यासाठी खूप वेळ जातो तसेच अथक प्रयत्न करावे लागतात तथापि लोकं टाकी साफ करण्याचं टाळतात आणि कंटाळा करतात परंतु, अशा किचकट पद्धतीशिवाय काही अशा सोप्या पद्धतीदेखील आहेत ज्यामुळे तुमची पाण्याची टाकी स्वच्छ होईल आणि तुम्हाला फार कष्टही घ्यावे लागणार नाहीत.
‘या’ तीन वस्तू करतील तुमचं काम सोप्पं (Water tank cleaning tips)
१. तुरटी
तुरटीचे अनेक फायदे आहेत. घरगुती कामांसाठी वापरली जाणारी तुरटी पाण्याला स्वच्छ करण्याचे काम करते. यामुळे तुरटीचा वापर करून टाकीतल पाणी स्वच्छ करू शकता.
कृती
१. तुरटीने टाकी स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी टाकी अर्धी रिकामी करा.
२. नंतर एका बादलीत पाणी घेऊन त्यात तुरटी घाला. काही वेळाने हे पाणी टाकीच्या पाण्यात ओता.
३. हे पाणी टाकीच्या पाण्यात ओतल्यानंतर त्यातील घाणं तळाला जमा होईल.
४. टाकीतलं पाणी रिकामी करून नंतर एका स्वच्छ कापडाने टाकीत जमा झालेली घाण साफ करा.
२. हायड्रोजन पॅरोक्साईड
हायड्रोजन पॅरोक्साईडचा वापर अनेक ठिकाणी जपून केला जातो. हायड्रोजन पॅरोक्साईडची ब्लिचिंग प्रॉपर्टी स्वच्छतेसाठी महत्त्वाची ठरते. पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी हा उपाय उत्तम मानला जाऊ शकतो.
कृती
१. एका मोठ्या पाण्याच्या टाकीला स्वच्छ करण्यासाठी ५०० मिलीलिटर हायड्रोजन पॅरोक्साईड घ्या आणि पाण्याच्या टाकीत मिसळा.
२. १५ ते २० मिनिटं हे हायड्रोजन पॅरोक्साईड पाण्यात तसंच सोडल्यानंतर घरातील सर्व नळ सुरू करा आणि टाकी रिकामी करा.
३. हे पाणी बाहेर पडल्यानंतर टाकी स्वच्छ होईल. टाकीचं पाणी बाहेर आल्यानंतर टाकी स्वच्छ पुसून घ्या आणि सुकवून घ्या व नंतर त्यात दुसरं पाणी भरा.
३. वॉटक टॅंक क्लीनर
वॉटक टॅंक क्लीनरचा वापर टाकी स्वच्छ धुण्यासाठी केला जाऊ शकतो. बाजारात अनेक प्रकारचे लिक्विड आणि पावडर स्वरूपात ब्लिच क्लिनर मिळतात. पण हे क्लीनर टॅंक क्लिनरच्या स्वरूपात ओळखले जातो.
कृती
१. ४०० ग्रॅम पावडर ब्लिच किंवा ३०० ग्रॅम लिक्विड ब्लिच घ्या. आता हे प्रमाण १० लिटर पाण्यात मिसळा.
२. त्यानंतर हे तयार केलेलं मिश्रण पाण्याच्या टाकीत घाला.
३. अशा पद्धतीने टाकी संपूर्ण स्वच्छ करून घ्या.