रोज कलिंगडाची एक खाप खाल्ल्याने हृदयविकार आणि वजनवाढीचा धोका टाळता येतो. कलिंगड खाल्ल्याने शरिरात हानिकारक कोलेस्ट्रोल निर्माण होण्यास प्रतिबंध येतो. अमेरिकेतील पर्ड्यू युनिवर्सिटीने उंदरांना उच्च चरबीयुक्त आहार दिल्यानंतर कलिंगड खाण्यास देऊन त्यांच्यावर परीक्षण केले. यामध्ये उंदरांची अतिरिक्त चरबी कमी झाल्याचे आणि हानीकारक ‘ लो डेनसिटी लिपोप्रोटीन’च्या (एलडीएल) संचयास प्रतिबंध घालण्यास मदत होत असल्याचे परीक्षणात आढळले. ‘एलडीएल’ हा कोलेस्ट्रोलचाच एक प्रकार आहे जो धमणींमध्ये अढथळा निर्माण करून हृदयविकारास आमंत्रण देतो.
कलिंगड वजनवाढीवर नियंत्रण करण्यासही मदत करते. त्यामुळे रक्त वाहिन्यांच्यामध्ये चरबी जमा होत नाही. कलिंगडमधील रसाळपणात असणा-या ‘सिट्रूलाइन’ रसायनात पोषक तत्व असतात. सिट्रूलाइन रक्तदाब कमी करून हृदयविकार रोखण्यामध्ये मदत करतो.

Story img Loader