Watermelon peel benefits : उन्हाळ्यात लोक कलिंगड पपई, लिची, टरबूज या फळांचे भरपूर सेवन करतात. या सर्व फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लोक ते जास्त खातात कारण ते शरीराला सहज हायड्रेट ठेवते. पण आपण या फळांची साल फेकून देतो, तर फळांची सालही अनेक घरगुती कामांसाठी वापरता येते. तुम्हीही जर कलिंगड खाल्यानंतर त्याची साल कचऱ्यात टाकत असाल तर असे करु नका, कारण त्याचा स्वयंपाकघरापासून घरातील कुंड्यांना खत म्हणून वापर करता येतो. या लेखात कलिंगडाची साल कशी वापरू शकता याबद्दल सांगणार आहोत.
कलिंगडाची साल कशी वापरावी
टाइल्सवरील डाग काढून टाका
कलिंगडाच्या सालीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यासाठी कलिंगडाची साल बारीक करून त्याची पेस्ट बनवा. आता त्यात एक चमचा भां धुण्याचे लिक्विड मिसळा. आता ही पेस्ट टाईल्सवर जिथे हळदीचे डाग आहेत तिथे लावा आणि काही वेळाने पाण्याने स्वच्छ करा. यामुळे हळदीचा थर एकाच वेळी निघून जाईल आणि नव्यासारखी चमक येईल.
हेही वाचा – झोपेतून उठताच कॉफी पिता का? आताच सोडा ही सवय! तज्ज्ञांनी सांगितले कारण…
तेलकटपणा कमी होईल
त्याचबरोबर स्वयंपाकघरात ठेवलेल्या डब्यांवर धूळ आणि तेलकटपणामुळे थर साचतो. अशा स्थितीत पपईची साल बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि ती पेस्ट डब्यांवर व झाकणावर लावा आणि नंतर कापडाने घासून स्वच्छ करा. यामुळे सर्व तेलकटपणा निघून जाईल. ही पेस्ट वापरून तेलकट बाटल्या न धुता चमकू शकतात.
झाडे हिरवीगार होतील
त्याचबरोबर तुम्ही घरासमोरील बागेत किंवा कुंड्यामध्ये लावलेली रोप हिरवी ठेवण्यासाठी देखील हे साल वापरू शकता. फक्त कलिंगडाची साल एका भांड्यात पाण्यात ठेवा. आता ते नीट झाकून ठेवा आणि ३ दिवस तसेच सोडा. तीन दिवसांत आपल्याला दररोज एकदा थंड पाण्यात मिसळावे लागेल. आता हे पाणी बाटलीत भरून झाडांवर फवारावे लागेल. यामुळे रोप ताजी आणि हिरवीगार राहतात.