सर्वात जुने बिन बिया असलेलं फळ म्हणजे केळं. निसर्गतच जंतुनाशक वेष्टनामध्ये असल्याने, केळ्यातून जंतूंची बाधा होत नाही, त्यामुळे आपोआपच सर्वाचे आरोग्य उत्तम राहते. वर्षभर उपलब्ध असणारे, सर्वाच्या खिशाला परवडणारे हे फळ आबालवृद्धांना आवडते. केळ्याला शास्त्रीय भाषेमध्ये ‘मुसा पॅराडिसिअ‍ॅका’ म्हटले जाते. केळी खाण्याचे अनेक गुणधर्म आहेत. केळ्यामध्ये पोषणमूल्य अनेक असल्यामुळे सकस आहारामध्येच त्याची गणना केली जाते. यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने, खनिजे, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस तसेच शरीराला ऊर्जा देण्याची शक्ती व उष्मांक भरपूर प्रमाणात आहेत. सर्व फळांमध्ये केळे हे अधिक उष्मांक देणारे फळ आहे. केळ्यांप्रमाणेच केळीच्या सालींमध्येही अनेक औषधी गुणधर्म आहेत.

बऱ्यादा केळी खाल्ल्यानंतर आपण त्याची साल फेकून देतो. परंतु केळ्यांइतकंच त्याच्या सालांमध्ये सत्व आहे. त्याचे अनेक उपयोग असून आरोग्यासाठी ही साल अत्यंत गुणकारी आहे. केळीच्या सालामुळे वजन कमी होते. तसंच त्याच्यामध्ये बी-६ आणि बी-१२ हे व्हिटामिन आहे. सोबतच त्याच्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि खनिजे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊयात केळीच्या सालाचे फायदे –

१. केळीच्या सालामध्ये व्हिटामिन एचे प्रमाण जास्त आहे. व्हिटामिन ए मुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

२. या सालांच्या सेवणामुळे मोतीबिंदू सारखा आजार बरा होण्यास मदत मिळते.

३. सालामध्ये अँटी- ऑक्सिडेंट्स असण्यासोबतच व्हिटामिन-बी ६ चं प्रमाण जास्त असतं.

४. पचनक्रिया सुरळीत होते.

आणखी वाचा – शारीरिक व्यायामाने मेंदूला फायदा

५. यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

६. काही अभ्यासकांच्या मते, केळामध्ये सेरॉटोनिन असल्यामुळे डिप्रेशन सारखा आजार होण्याची शक्यता कमी असते.

७. हदयाचं कार्य सुरळीत राहतं.

आणखी वाचा – केसांना तेल लावताना काय करावं आणि काय टाळवं 

केळी खरेदी करताना कधीही त्याचं साल पाहून घ्यावं. केळी कधीही पूर्ण कच्ची किंवा जास्त पिकलेली नसावित. थोडंस पिवळसर झालेल्या सालींमध्ये अँटी-एक्सिडेंटचं प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढविण्यास मदत करते. जर केळी कच्ची असतील तर त्यांना १० मिनीटे पाण्यात उकळवून घ्या.

Story img Loader