Saree Styling: पाऊस सध्या जोमात सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्याने, उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात आपण स्वतःच्या राहणीमानावर विशेष लक्ष ठेवतो. पावसाळ्यात कपड्यांविषयी बोलायला गेलं तर, या सीझनमध्ये लोक पाश्चात्य पोशाख घालणे पसंत करतात. मात्र, या सीझनमध्ये खरं तर तुम्ही वेगवेगळे लुक्स ट्राय केले पाहिजेत. ज्यांना या सीझनमध्ये साड्यांची आवड आहे, तर त्यासाठी तुम्ही सुंदर साड्यांचाही लुक्स ट्राय करू शकता. या हंगामात तुम्ही तुमच्या साडी कलेक्शनमध्ये काही रंगीबेरंगी साड्या जोडू शकता. तर आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्ही पावसाळ्यात तुमच्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये भर घालू शकता आणि स्वतःचा वेगळा लुक्स ट्राय करू शकता.
हॅप्पी शेड्स निवडा
आजकाल पेस्टल रंग ट्रेंडमध्ये आहेत, त्यामुळे जरी तुम्हाला हे रंग कितीही आवडत असले, तरीही पावसाळ्यात तुम्ही ते खरेदी करणं टाळले पाहिजे. या काळात तुम्ही गडद आणि आनंदी रंग निवडू शकता. जसे की, गुलाबी, केशरी, पिवळा, गंज, जांभळा, मरून हे रंग पावसाळ्यात उठून दिसतील. तसंच तुमचा वेगळा लुक्स सुद्धा दिसून येईल.
(हे ही वाचा: Denim Styling Tips: डेनिमच्या ‘या’ ट्रेंडी आणि स्मार्ट स्टाइल्स वापरून पाहा; मिळेल स्मार्ट लूक)
वेगळी स्टाईल करा
सध्या धोती साडी, रेडी टू वियरचा जमाना आहे. या जमान्यात तुम्ही, नेहमीच्या पद्धतीने साडी नेसण्यापेक्षा या नवीन ट्रेंड प्रमाणे साडी नेसावी. आजकाल बॉलिवूड सिलेब्रिटी जेगिंग्ज किंवा जीन्ससह साडी नेसतात. तर तुम्ही देखील अशावेळी स्टायलिश दिसण्यासाठी या पद्धतीचे ट्रेंड प्रमाणे साडी नेसू शकता आणि तुमच्या साडीला अशा प्रकारे स्टाइलही करू शकता.
प्रिंट्सची योग्य निवड करा
या ऋतूत फ्लॉवर डिझाइन्स छान दिसतात. तुम्ही या प्रकारचे डिझाईन कॅरी करू शकता. जर तुम्ही पावसाळ्यात एखादी साडी खरेदी करायचा विचार करत असाल, तर फ्लॉवर डिझाइन्सच्या साड्या खरेदी करण्यात विशेष भर द्या. असले डिझाइन्स उठून देखील दिसतील आणि वेगळा लुक्स देखील तयार होईल.
( हे ही वाचा: Monsoon Travel Tips: पावसाळ्यात प्रवास करताय? ‘या’ टिप्स फॉलो करा, प्रवास सोयीस्कर होईल)
योग्य फॅब्रिक खरेदी करा
साडी खरेदी करताना फॅब्रिकच्या निवडीकडे लक्ष द्या. पावसाळ्यासाठी शिफॉन, पॉली जॉर्जेट आणि जॉर्जेट चांगले मानले जातात. ते तुमच्या त्वचेवर हलके असतात. त्यामुळे अशा सध्या या ऋतूत खरेदी करा. पावसाळ्यात कॉटनच्या साड्या घालणे टाळा. त्या पावसाळ्यात नीट दिसतही नाहीत, तसंच त्या या ऋतूत लवकर सुकतही नाहीत.