लग्न हे दोन जीवांचे मीलन असले तरी त्यानिमित्त त्यांच्याशी संबंधित असलेले शेकडो आप्तस्वकीय आणि परिचित नटण्या-मुरडण्याची हौस भागवून घेतात. त्यामुळे कोणताही विवाह सोहळा म्हणजे ठेवणीतले कपडे घालून आलेल्या वऱ्हाडी मंडळींचा फॅशन सोहळाच असतो. दिवाळीनंतर तुळशीची लग्ने झाली की आपल्याकडे घरोघरी मांडव पडू लागतात.

लग्नातील वऱ्हाडी मंडळींमध्ये आपण चारचौघांपेक्षा उठून दिसावे म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतो. लग्नाच्या दिवशी संपूर्ण कुटुंबीय एकाच पद्धतीचा पेहराव करण्याची पद्धत सध्या प्रचलित आहे. कुणी परंपरागत तर कुणी पाश्चिमात्य पद्धतीची वेशभूषा करतात. सध्या लग्न सोहळ्यात खालील पद्धतीचे पोशाख प्रचलित आहेत.

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
nikhil rajeshirke wedding ritual begins
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर
Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच
bhagare guruji son Akhilesh bhagare will get marriage anagha atul share video
भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच अडकणार लग्नबंधनात; लेकीने लग्नघराचा व्हिडीओ केला शेअर
some shubh muhurat for wedding in November and December this year
दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…
Batoge To Katoge wedding card viral
हद्दच झाली! लग्नाच्या पत्रिकेवरही आता ‘बटोगे तो कटोगे’चा नारा; व्हायरल होणाऱ्या लग्नपत्रिकेत मोदी-योगींचा फोटो
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी

क्रॉप टॉप व स्कर्ट

नेहमीच्या साडय़ांची जागा आता लेहेंगा, अनारकली, स्कर्ट यांनी घेतली आहे. हल्ली रिसेप्शनसाठी मुली बिनदिक्कत क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान करताना दिसून येतात. त्यामध्ये प्लेन टॉप आणि फ्लोरल स्कर्ट असे छान समीकरण सध्या बाजारात उपलब्ध आहे. तसेच जर थोडय़ा शायनी लुकसाठी वर्क केलेला टॉप आणि ग्लॉसी फॅब्रिकच्या स्कर्टला तरुणी सध्या पंसती देत आहेत.

पाँजा.

जॅकेट गाऊनशी साधम्र्य असणारा हा पँाजा सध्या लग्नांमध्ये सर्वाच्या आकर्षणाचा भाग बनला आहे. सिंगल कलरचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट त्यावर हेवी नेक  एम्ब्रॉयडरी केलेला ‘पँाजा’ घालण्याकडे तरुणींचा कल दिसत आहे. अशा पेहरावांवर कमी दागिने घातले जातात. जेणेकरून समारंभामध्ये सुटसुटीतपणे वावरता येते.

कुठे मिळतील?

’ मुंबईतील बांद्रा, खार, मलाड, बोरिवली, दादर, अंधेरी, लोखंडवाला येथील ब्रॅण्डेड स्टोरमध्ये अशा प्रकारचे कपडय़ांच्या असंख्य प्रकार तुम्हाला सहज उपलब्ध होतील. साधारण रु. २००० पासून ते अगदी रु. २५,०००च्याही वर या कपडय़ाच्या किमती आहेत.

लाँग टॉप आणि लेहंगा

सध्या लेहंग्याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. मात्र त्यामधला सर्वात हीट प्रयोग म्हणजे लाँग टॉप आणि लेहंगा. घेरदार स्कर्ट आणि त्यावर मध्ये कट असलेला लांबलचक टॉप सध्या तरुणींना भुरळ घालत आहे. कारण या ड्रेसमध्ये टॉप आणि स्कर्टमधील भागातून कंबर दिसते. त्यामुळेच हा पेहराव करण्यासाठी अनेकांनी आपल्या कमरेचा घेरा कमी करण्याचे प्रयोगही सुरू केले आहेत. त्यामध्ये बुट्टीचा टॉप आणि प्लेन स्पार्कलीन लेहंगा घालण्याचा ट्रेण्ड आहे.

लेहेंगा साडी

लग्नाला घेतली जाणारी साडी परत नेसता येईलच याची शक्यता कमी असते. त्यामुळे ती कपाटामध्ये तशीच पडून राहते. त्याऐवजी लेहंगा साडीसारखे पर्याय निवडले की भविष्यात ते साडी वेगळी आणि लेहेंगा वेगळा असे घालता येतात. साडीवर सध्या मल्टिकलर किंवा गोल्डन ब्लाऊज वापरण्याचा ट्रेण्ड आहे. जेणेकरून नंतर तो इतर साडय़ांसोबतही घालता येऊ  शकतो. त्या जागी क्रॉप टॉपचा वापरही करता येऊ  शकतो. लेहेंगाच्या चोलीसोबतही हेच करता येऊ  शकते. मल्टिकलर किंवा एखाद्या बेस कलरच्या (गोल्डन, सिल्व्हर, कॉपर आदी)चोलीनंतर साडीवर ब्लाऊजची सध्या चलती आहे.

जॅकेट गाऊन

लेहंगा, स्कर्ट, क्रॉप टॉप यापेक्षा काही तरी वेगळं आणि हटके ड्रेसिंग हवं असल्यास हल्ली बाजारात जॅकेट गाऊन्सची चलती दिसून येते. लाइट ऑफ शोल्डर गाऊनवर सॉफ्ट नेटचं हेवी वर्क केलेलं जॅकेट सध्या सर्वाच्या पसंतीस उतरत आहेत. यामध्ये अबोली, लाइट पिंक, पिस्ता असे इंग्लिश कलर सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

थ्री इन वन

लाँग टॉप आणि लेहंगा हा ड्रेस मल्टीयुजेबल आहे. लग्नाव्यतिरिक्त इतर कोणत्याही समारंभासाठी लाँग टॉपवर लेहेंग्याऐवजी पॅण्ट सध्या बाजारात मिळते. तसेच जर आपल्याला हाच लेहेंगा पुन्हा नव्याने वापरात आणावयाचा असल्यास त्यावर एखादा साजेसा क्रॉप टॉप घेतल्यास पुन्हा नवा ड्रेस तयार होतो. त्यामुळे सध्या दुकानदारांनी अशा प्रकारचे कॉम्बो ड्रेस बाजारात आणले आहेत.

मुंबई परिसरातील शाळांमध्ये होणारे विविध उपक्रम, कार्यक्रम, विशेष कार्य, गुणगौरव, शिबिरे, प्रशिक्षण वर्ग यांची माहिती ‘शिक्षणजगत’ या सदराकरिता पुढील पत्त्यावर पाठवा.

पत्ता : ‘लोकसत्ता’, दुसरा मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१.

फॅक्स क्र. ०२२-२२८२२१८७/२२८४६२७७. ईमेल : mumbailoksatta@gmail.com