बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. बैठी कामाचे स्वरूप, पुरेसा व्यायाम न करणे, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, आहारात जंक फुडचा भडीमार यांमुळे वजन लगेच वाढते. वजन वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जराही वजन वाढले की ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेवणाच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढू शकते. याशिवाय काही आजरांमुळे देखील वजन वाढू शकते हे बऱ्याच जणांना माहित नसते. कोणत्या आजारांमुळे वजन वाढू शकते जाणून घ्या.

Health Tips : पालक व मेथीमध्ये कोणती भाजी खाणे ठरते अधिक फायदेशीर? जाणून घ्या याचे आरोग्याला होणारे फायदे

टाईप २ मधुमेह
रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त झाल्यास वजन वाढू शकते. तज्ञांच्या मते शरीरात इन्सुलिनचा प्रभाव वाढल्याने मधुमेह होऊ शकतो. एका रिसर्चनुसार १० पैकी ८ टाईप २ मधुमेहाचे रुग्ण वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असतात. तसेच वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींना मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे जर आनुवांशिकतेमुळे तुम्हालाही मधुमेह होण्याची शक्यता असेल तर वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.

उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब आणि वजन वाढण्याचा परस्पर संबंध असल्याचे तुम्ही ऐकले असेल. याचे कारण म्हणजे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलमुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळेच वजन देखील वाढू शकते. खराब कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होऊन रक्तप्रवाहात समस्या येऊ शकतात. रक्तदाब नियंत्रित नसेल तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुमचे वजन वाढत असेल तर नियमितपणे रक्तदाब तपासणे गरजेचे आहे.

थायरॉइड
थायरॉईडच्या रुग्णांना वजन कमी होण्याची किंवा वजन वाढण्याची समस्या जाणवू शकते. जर तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weight can increase due to these diseases know reason behind it pns