Bread For Weight Loss: पूर्वी फक्त पाश्चिमात्य देशात खाल्ला जाणारा ब्रेड आता भारतातही अगदी घरोघरी वापरला जातो. पोळ्या- भाकऱ्या करायला वेळ लागत असताना ब्रेड हा सोपा व वेळ वाचवणारा पर्याय ठरतो. असं असलं तरी आरोग्याच्या बाबत ब्रेड अनेकदा आपला शत्रू मानला जातो. जास्त कॅलरीज, जास्त शुगर, जास्त पित्त या सगळ्यामुळे ब्रेड टाळण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. पण सध्या एका नव्या अभ्यासात ब्रेड खाल्ल्याने चक्क तुम्हाला वजन आणि ते सुद्धा ओटी पोटाचे हट्टी वजन घटवण्यास फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.

प्लांट फूड्स फॉर ह्युमन न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ब्रेडच्या सेवनाच्या परिणामाची तपासणी करण्यासाठी ५० जपानी लोकांवर नियंत्रित चाचणी घेण्यात आली. अभ्यासात सहभागी झालेल्या सदस्यांच्या आहारामध्ये रिफाईंड गव्हाच्या ब्रेड ऐवजी संपूर्ण धान्याच्या गव्हाचा ब्रेड समाविष्ट करण्यात आला होता . या बदलासह व्हिसेरल फॅट कमी होईल का याचा अभ्यास करण्यात आला होता.

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Kartik Aaryan’s Surprise Visit to Bhool Bhulaiyaa 3 Theatre Goes Viral – A Girl was Too Busy with Popcorn
कार्तिक आर्यन समोर अन् पोरगी पॉपकॉर्न खाण्यात बिझी, VIDEO पाहून म्हणाल असा अ‍ॅटिट्यूड हवा!
Vidarbha special tondlichi masala bhaji recipe in marathi eating pointed gourd is good for health
विदर्भ स्पेशल तोंडलीची भाजी; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी
Heart Attack Prevention
Heart Attack: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वयाच्या विशीत अन् तिशीत ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल

अभ्यासाचे परिणाम जाणून घेण्यापूर्वी आपण अभ्यासात सहभागी झालेल्या मंडळींची माहिती घेऊया.. या ५० सहभागींचा बॉडी मास इंडेक्स सामान्य २३.५ किलो पेक्षा जास्त होता आणि त्यांना दोन गटांमध्ये विभागले गेले. एका गटाला रिफाईंड गव्हाचा ब्रेड खाण्यास सांगितले गेले होते, तर इतरांना संपूर्ण-ग्रेन गव्हाचा ब्रेड खाण्यास सांगितले होते. तीन महिन्यांनंतर असे आढळून आले की संपूर्ण गव्हाचा ब्रेड खाणाऱ्या गटामध्ये व्हिसरल फॅट किंवा पोटाची चरबी लक्षणीयरीत्या कमी झाली होती.

व्हिसरल फॅट कमी करण्यासाठी संपूर्ण गव्हाचा ब्रेड कशी मदत करतो?

या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी, व्हिसरल फॅट म्हणजे नेमके काय ते समजून घेऊ. तज्ज्ञांच्या मते, व्हिसरल फॅट हे अंतर्गत अवयवांना चिकटलेले फॅट्स असतात. यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि विशिष्ट कर्करोग यांसारख्या आरोग्य समस्यांची जोखीम वाढू शकते.

दरम्यान, जपानमध्ये झालेल्या अभ्यासाविषयी समीना अन्सारी, वरिष्ठ आहारतज्ज्ञ , केअर हॉस्पिटल्स, सांगतात की, “संपूर्ण गव्हाच्या ब्रेडमध्ये न विरघळणारे फायबर आढळते. हे फायबर शरीरातील फॅट्स आतड्यांमध्ये पुन्हा शोषले जाणार नाहीत याची खात्री करतात. या प्रक्रियेत यकृताला अधिक पित्त (ऍसिड) तयार करावे लागते ज्यामुळे, अधिक कोलेस्ट्रॉलचा वापर होतो व शेवटी एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा कमी होते.

संपूर्ण धान्य हे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे चांगले स्त्रोत आहेत. याशिवाय, संपूर्ण धान्याचे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

दरम्यान, एक लक्षात घ्या की फक्त ब्रेड खाऊन वजन कमी करता येणार नाही त्यासाठी आपण काही सवयी जपणे आवश्यक आहे. ज्यात संपूर्ण धान्य, फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे तसेच नियमित व्यायाम आणि तणाव व्यवस्थापित करणे देखील आवश्यक आहे.

हे ही वाचा<< तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असायला हवे? Perfect बॉडी साठी पाहा सोप्पा तक्ता

तसेच, संपूर्ण गव्हाचा ब्रेड वजन कमी करण्यास मदत करू शकतो पण प्रत्येकासाठी याचा सल्ला दिला जाऊ शकत नाही. अन्सारी यांनी स्पष्ट केले की, “ज्या लोकांना कमी फायबर किंवा कमी कार्बोहायड्रेट आहाराची गरज आहे त्यांना संपूर्ण गव्हाचा ब्रेड टाळणे योग्य ठरेल.